Adipurush Movie: प्रभास ओम राऊतवर भडकला; व्हिडिओमध्ये राग स्पष्ट दिसला, नेटकरी म्हणाले- हा प्यायलाय का..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 20:13 IST2022-10-04T20:05:47+5:302022-10-04T20:13:09+5:30
Aadipurush Movie: आदिपुरुष टीझर वादात प्रभासचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Adipurush Movie: प्रभास ओम राऊतवर भडकला; व्हिडिओमध्ये राग स्पष्ट दिसला, नेटकरी म्हणाले- हा प्यायलाय का..?
Aadipurush Movie: सुपरस्टार प्रभास सध्या त्याच्या आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. 2 ऑक्टोबरला अयोध्येत आदिपुरुषचा टीझर प्रदर्शित झाला. टीझर समोर आल्यापासून चित्रपट वादात सापडला आहे. चित्रपटाला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. युजर्स चित्रपटाच्या व्हीएफएक्स आणि स्टार्सच्या लूकची खिल्ली उडवत आहेत. या दरम्यान, प्रभासचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Om you coming to my room 🙂 pic.twitter.com/kM1UppGVr3
— Venu Prabhas™ (@TheVenuPrabhas) October 3, 2022
व्हिडिओबाबत असा दावा केला जातोय की, चित्रपट सतत वादात अडकत असल्याचे पाहून प्रभास चांगलाच संतापला आहे. त्यामुळे व्हिडीओमध्ये तो चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत याला रागाने आपल्याकडे बोलवत आहे. या व्हिडिओमध्ये प्रभास चांगलाच चिडलेला दिसतोय. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर यूजर्स एकामागून एक कमेंट करत प्रभास आणि चित्रपटाची खिल्ली उडवत आहेत. एका यूजरने लिहिले की, प्राभास प्यायला आहे का? इतर अनेक युजर्स व्हिडिओवर हास्याचे इमोजी शेअर करत आहेत.
रामायणावर आधारित या चित्रपटात दाखवण्यात आलेली पात्रे कोणत्याच बाजुने धार्मिक दिसत नाहीत, असे युजर्सचे म्हणणे आहे. रावणाच्या भूमिकेत दिसणारा सैफ अली खान मोगलसारखा दिसतो, असे अनेकांचे मत आहे. यासोबतच चित्रपटाच्या व्हीएफएक्सचीही खिल्ली उडवली जात आहे. व्हीएफएक्स इतके वाईट आहेत की, कार्टून चॅनेलमध्येही यापेक्षा चांगले व्हीएफएक्स बनवतात, असे नेटकरी म्हणत आहेत. हनुमानालाही लेदर जॅकेट घातलेले पाहून प्रेक्षक निराश आहेत. निर्मात्यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप लोकांनी केला आहे. सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या क्रिती सेननलाच पसंती मिळाली आहे.