'गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल..', बॉलिवूड अभिनेत्री दिसली मुंबईच्या रस्त्यावर कचरा उचलताना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 16:36 IST2022-02-14T16:12:04+5:302022-02-14T16:36:02+5:30
'गाडी वाला आया घर से कचरा निकाल..' अनेकदा सेलिब्रेटींना त्याच्या नावाचीच चर्चा व्हावी किंवा मग सतत चर्चेत राहणे खूप आवडते.

'गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल..', बॉलिवूड अभिनेत्री दिसली मुंबईच्या रस्त्यावर कचरा उचलताना
अनेकदा सेलिब्रेटींना त्याच्या नावाचीच चर्चा व्हावी किंवा मग सतत चर्चेत राहणे खूप आवडते. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सेलिब्रेटी मंडळी आपले फोटो व्हिडीओ शेअर करत वाहवा मिळवताना दिसतात.अनेकदा अतरंगी फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असल्याचे अनेकदा पाहायला मिळतात. सध्या अशाच एका सेलिब्रेटींचा फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
व्हॅलेंटाईन डे(Valentine day) पच्या दिवशी बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा तिच्या इन्स्टाग्रामवरील रीलमुळे चर्चेत आली आहे. व्हिडिओमध्ये अदा मुंबईच्या रस्त्यांवरील कचरा उचलत रॅम्पवर चालताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती कचऱ्याची तुलना तिच्या बॉयफ्रेंडशी करताना दिसत आहे. अभिनेत्री डस्टबिन (Adah Sharma Dutbin Reel)सोबत रिल करताना दिसतेय. अदा यात दोन्ही हातांनी कचरा अनोख्या स्टायलने उचलताना दिसतेय.
अदा तिच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे चाहत्यांशी संवाद साधताना दिसते. ती अनेकदा हटके व्हिडिओ बनवून चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसते.अदा गेल्या काही दिवसांपासून कोणत्या सिनेमात झळकत नसली तरी, सोशल मीडियावर मात्र तिचे दर्शन चाहत्यांना घडत असते. अदाने अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली होती.
अभिनयाप्रमाणे तिच्या सौंदर्यावरही चाहते फिदा असतात. 2008मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘1920’ या सिनेमामधून अदाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमानंतर तिने मागे वळून पाहिल नाही. ‘हंसी तो फसी’, ’कमांडो 3’ सारखेहिट सिनेमातल्या अदाच्या भूमिकांनाही प्रचंड पसंती मिळाली होती. बॉलिवूडप्रमाणे ती दाक्षिणात्य सिनेमातही झळकली आहे. बॉलिवूडप्रमाणे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही तिचा मोठा चाहता वर्ग आहे.