Zareen Khan Mother: जरीन खानवर कोसळला दु:खाचा डोंगर; प्रदीर्घ आजारानंतर आईचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 10:57 IST2026-04-08T10:55:49+5:302026-04-08T10:57:03+5:30

Zareen Khan Mother Death: जरीन खान आणि बहीण सना यांच्या डोक्यावरुन मायेचं छत्र हरपलं.

actress zareen khan mother parveen khan passes away after prolonged disease | Zareen Khan Mother: जरीन खानवर कोसळला दु:खाचा डोंगर; प्रदीर्घ आजारानंतर आईचं निधन

Zareen Khan Mother: जरीन खानवर कोसळला दु:खाचा डोंगर; प्रदीर्घ आजारानंतर आईचं निधन

बॉलिवूड अभिनेत्री जरीन खानवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. जरीनच्या आईचं परवीन खान यांचं आज निधन झालं. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जरीन खानच्या टीमने सोशल मीडियावर स्टेटमेंट जारी करत ही दु:खद बातमी दिली. जरीन खानला सना ही बहीणही आहे. दोघींच्या डोक्यावरुन मायेचं छत्र हरपलं आहे. आज वर्सोवा स्मशानभूमीत परवीन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

जरीन खानच्या टीमने स्टेटमेंट शेअर करत लिहिले, "हे कळवण्यास अत्यंत दु:ख होत आहे की  जरीन आणि सना खानची आई आमची प्रिय परवीन खान यांचं आज ८ एप्रिल रोजी निधन झालं." 

परवीन खान या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. जरीन अनेकदा सोशल मीडियावर आईच्या तब्येतीसंदर्भात अपडेट देत होती. तसंच तिच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करा अशी विनंतीही करत होती. दरम्यान त्यांच्या निधनामुळे जरीन धक्क्यात आहे. 

वर्कफ्रंट

जरीन खान बऱ्याच काळापासून अभिनयापासून दूर आहे. 'फिर से रिस्टार्ट'मधून तिने करिअरला सुरुवात केली होती. नंतर सलमान खानने तिला २०१० साली 'वीर' सिनेमात घेतलं आणि तिचं नशीब पालटलं. जरीनला कतरिना कैफची ड्युप्लिकेट असंही म्हटलं गेलं. जरीनने 'हेट स्टोरी ३ & ४','वजह तुम हो' या बी ग्रेड सिनेमांमध्येही काम केलं. तसंच ती अक्षय कुमारसोबत 'हाउसफुल २'मध्ये दिसली. २०२१ साली ती 'हम भी अकेले तुम भी अकेले' मध्ये शेवटची दिसली. 

Web Title : ज़रीन खान की माँ का लंबी बीमारी के बाद निधन।

Web Summary : अभिनेत्री ज़रीन खान की मां, परवीन खान, का लंबी बीमारी के बाद मुंबई में निधन हो गया। ज़रीन की टीम ने दुखद खबर की पुष्टि की। अंतिम संस्कार वर्सोवा में होगा। ज़रीन सोशल मीडिया पर अपनी मां के स्वास्थ्य के बारे में अपडेट साझा कर रही थीं।

Web Title : Zareen Khan's mother passes away after prolonged illness.

Web Summary : Actress Zareen Khan's mother, Parveen Khan, passed away in Mumbai after a long illness. Zareen's team confirmed the sad news. The funeral will be held in Versova. Zareen had been sharing updates about her mother's health on social media.