ब्लॉकबस्टर 'धुरंधर'मध्ये यामी गौतमलाही करायचं होतं काम? स्क्रिप्ट वाचून झालेली अवाक्; कुठे बिनसलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 13:52 IST2025-12-30T13:47:38+5:302025-12-30T13:52:33+5:30
आदित्य धरच्या धुरंधरमध्ये पत्नी यामीलाही करायचं होतं काम? अभिनेत्रीने खुलासा करत म्हणाली-"त्या भूमिकेसाठी…"

ब्लॉकबस्टर 'धुरंधर'मध्ये यामी गौतमलाही करायचं होतं काम? स्क्रिप्ट वाचून झालेली अवाक्; कुठे बिनसलं?
Yami Gautam: आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' या स्पाय-अॅक्शन थ्रिलर सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर दबदबा अजूनही कायम आहे. रणवीर सिंगसह तगडी स्टारकास्ट असलेला धुरंधर हा चित्रपट ५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला. त्या दिवसापासून आजपर्यंत या चित्रपटाला सिनेरसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. सिनेमाबद्दल काहीजण सकारात्मक आणि नकारात्मक बोलताना दिसत आहे. मात्र, बॉक्स ऑफिसवर धुरंधर सुस्साट आहे. अनेक कलाकार देखील या सिनेमाचं कौतुक करत आहेत. त्यात आता या सिनेमाच्या दिग्दर्शकाने धुरंधर संबंधित केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
आदित्य धरच्या चित्रपटात सारा अली खान, रणवीर सिंग, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना, संजय दत्त आणि आर. माधवन यांसारखे तगडे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. मात्र,दिग्दर्शक आदित्य धरची पत्नी यामी गौतमही उत्तम अभिनेत्री आहे. पण, तिला या चित्रपटाचा भाग होता आलं नाही. अलिकडेच 'न्यूज18' सोबत यामीने संवाद साधला. या मुलाखतीमध्ये यामीने चित्रपटात काम करण्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. "धुरंधरची स्क्रिप्ट वाचत असताना मला खरंच वाटत होतं की, मी मुलगा असते तर बरं झालं असतं. कारण पटकथा अप्रतिम आहे. या माध्यमातून आदित्यने वेगळं जग समोर आणलं आहे."
यानंतर यामीने पुढे सांगितलं, ती आपले वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य वेगळं ठेवते. यामी म्हणाली,"माझ्या अशा काही अपेक्षा नाहीत. आम्ही या प्रोफेशनचा आदर करतो.या बाबतीत आम्ही पूर्णपणे स्पष्ट आहोत. जर ते एखादी स्क्रिप्ट लिहित असतील आणि त्यांना वाटत असेल की त्या भूमिकेसाठी दुसरी कोणीतरी व्यक्ती अधिक योग्य आहे, तर माझी काहीच हरकत नाही. आमच्यामध्ये या गोष्टी सुरुवातीपासूनच क्लिअर आहेत." असं ती म्हणाली. या मुलाखतीत यामीने स्क्रिप्ट वाचताच तिच्या मनात आपणही चित्रपटाचा भाग व्हावं, अशी इच्छा निर्माण झाली होती.