दीपिका पादुकोणच्या ८ तास काम करण्याच्या मागणीला सोनाक्षीने दिला पाठिंबा, म्हणाली- "महिला कलाकारांसाठी...",

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 09:59 IST2025-06-24T09:56:15+5:302025-06-24T09:59:06+5:30

दीपिका पादुकोणच्या ८ तास काम करण्याच्या मागणीबद्दल सोनाक्षी सिन्हाचं स्पष्ट मत, म्हणाली...

actress sonakshi sinha supported deepika padukone demand to work for 8 hours says | दीपिका पादुकोणच्या ८ तास काम करण्याच्या मागणीला सोनाक्षीने दिला पाठिंबा, म्हणाली- "महिला कलाकारांसाठी...",

दीपिका पादुकोणच्या ८ तास काम करण्याच्या मागणीला सोनाक्षीने दिला पाठिंबा, म्हणाली- "महिला कलाकारांसाठी...",

Sonakshi Sinha: सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीत कलाकारांच्या कामाच्या वेळेचा मुद्दा हा ऐरणीवर आला आहे. अलिकडेच, अभिनेत्री दीपिका पादुकोणला (Deepika Padukone) ८ तासांच्या शिफ्टच्या मागणीमुळे महत्त्वाचा प्रोजेक्ट गमवावा लागला. दीपिकाच्या या मागणीचं समर्थनार्थ करत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपलं मत मांडलं. आता सोनाक्षी सिन्हाचीही (Sonakshi Sinha)  प्रतिक्रिया समोर आली आहे.

दरम्यान, दीपिका पादुकोणला केलेल्या  ८ तास काम करण्याच्या मागणीला सोनाक्षी सिन्हाने पाठिंबा दिला आहे. नुकताच सोनाक्षीने इंडिया टुडे सोबत संवाद साधला. त्यादरम्यान अभिनेत्रीने दीपिकाच्या स्पिरिटमधील एक्झिटवर म्हणाली, ''हे खरं आहे की नाही हे मला माहित नाही, पण जर खरंच असं असेल तर तिची  मागणी योग्य आहे. मी अशा पुरुष कलाकारांसोबत काम केलं आहे जे दिवसाला ८ तासांपेक्षा जास्त काम करत नाहीत. मग महिला कलाकारांसाठी वेगळे नियम का? तुम्ही असं वेळापत्रक बनवू शकता ज्यामध्ये काम ८ तासांत पूर्ण करता येईल. मला वाटतं की ते शक्य आहे."

पुढे सोनाक्षी म्हणाली,"जर मी असा चित्रपट करत असेल ज्यासाठी मला मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या तंदुरुस्त राहणं आवश्यक आहे, तर मला जिममध्ये जाणं गरजेचं असेल. जर तुम्ही मला १२ ते १४ तास सेटवर ठेवलं तर मी ते करू शकणार नाही. त्या एक्स्ट्रा मेहनतीसाठी माझ्याकडे वेळच उरणार नाही. तिची मागणी अतिशय योग्य आहे कारण तुम्हाला शूटिंग व्यतिरिक्त स्वतःसाठी वेळ हवा असतो. जर मला त्या भूमिकेसाठी वेगळी मेहनत करावी लागत नसेल तर ती १२ तासांच्या शिफ्टमध्येही आनंदी आहे. मी त्यांना माझे १२ किंवा १० तास देऊ शकते." असं मत आता सोनाक्षी सिन्हानेही मांडलं आहे.

Web Title: actress sonakshi sinha supported deepika padukone demand to work for 8 hours says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.