'हम आपके है कौन' मध्ये सलमानसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? रेणुका शहाणे म्हणाल्या-"तो खूप..." 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 13:31 IST2025-11-11T13:29:21+5:302025-11-11T13:31:54+5:30

रेणुका शहाणेंनी सांगितला सलमान खानसोबत काम करण्याचा अनुभव, म्हणाल्या-"सुदैवाने तो…"

actress renuka shahane recalls memories of hum aapke hain koun movie shares work experience with salman khan | 'हम आपके है कौन' मध्ये सलमानसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? रेणुका शहाणे म्हणाल्या-"तो खूप..." 

'हम आपके है कौन' मध्ये सलमानसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? रेणुका शहाणे म्हणाल्या-"तो खूप..." 

Renuka Shahane: हिंदी चित्रपटसृष्टीत आजवर काही सुरेख चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यातील बरेच चित्रपट प्रेक्षक आजही मोठ्या आवडीने पाहतात. त्यातीलच एक नाव म्हणजे हम आपके है कौन. ९० च्या दशकातील सूरज बडजात्या दिग्दर्शत हा कौटुंबिक ड्रामा प्रकारातील सिनेमा रसिकांच्या पसंतीस उतरली. १९९४ साली प्रदर्शित झालेल्या या मल्टिस्टारर सिनेमातील प्रत्येक कलाकाराच्या भूमिकेनेही प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यातही सलमान खान, माधुरी दीक्षित आणि रेणुका शहाणेंनी साकारलेली पात्रं नावाजली गेली. अभिनेत्री रेणुका शहाने यांनी चित्रपटात साकारलेल्या पूजा नावाच्या पात्राचं सगळीकडे कौतुक झालं. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रेणुका यांनी चित्रपटासंबंधित अनेक किस्से शेअर केलेत.

अलिकडेच झुमला दिलेल्या मुलाखतीमध्ये रेणुका शहाणे हम आपके है कौनच्या सेटवरच्या आठवणी  शेअर केल्या.त्याचबरोबर सलमान खानबरोबर काम करण्याचा अनुभवही त्यांनी सांगितला. त्या म्हणाल्या, "आम्ही  सेटवर खूप मजा केली. 'वाह वाह रामजी'गाण्यामध्ये अनुपम खेर जी लाडू खातात त्यादरम्यान अनेक गमतीजमती घडल्या. ते एक चांगले अभिनेता आहेत आणि त्यांना विनोदाची उत्तम जाण आहे. त्यावेळी लक्ष्मीकांत बेर्डे देखील आमच्यासोबत होते. आणि त्याचा सेन्स ऑफ ह्यूमर इतका कमाल होता की त्याबाबतीत लक्ष्याचा कोणीच हात पकडला नसता."

सलमानबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता?

त्यानंतर सेटवर सलमान कसा वागायचा, त्याच्याबरोबर काम करण्याचा अनुभवाबद्दल सांगताना रेणुका शहाणे म्हणाल्या, सलमान खूपच खोडकर होता. पण, सुदैवाने तो सेटवर खोड्या करत नसे. सूरज बडजात्यांसोबत त्याचं चांगसी बॉण्डिंग होती. कारण, मैंने प्यार किया पासून त्याने त्यांच्यासोबत काम केलं. आमच्यात ऑफस्क्रिन बॉण्डिंग चांगली असल्यामुळे पडद्यावर भावजय आणि दीराचं नातं आणखी चांगल्या पद्धतीने साकारण्यासाठी त्याची मदत झाली.

'धिक ताना धिक ताना' गाण्याचा किस्साही सांगितला...

याचदरम्यान, धिक ताना धिक ताना गाण्याच्या शूटिंगचा किस्सा सुद्धा रेणुका यांनी शेअर केला. त्या म्हणाल्या, "आम्ही धिक ताना गाण्याच्या शूटिंगसाठी ऊटीमध्ये गेलो होतो. या गाण्यात काही क्रिकेट सीक्वेंस देखील होते. मग त्यामध्ये रीमा लागू आणि अनुपम खेर यांची एन्ट्री होते. संपूर्ण कुटुंब एकत्र येतं. त्यावेळी मेकअपसाठी व्हॅनिटी व्हॅन नसायची. आम्ही सीनच्या आधीच कपडे वगैरे घालून तयार असायचो आणि सीन झाला की सगळेच दम शेराज खेळायचो. तेव्हा सतीश शाह देखील आमच्यासोबत असायचे आणि ते आम्हाला छान-छान गोष्टी सांगायचे. तसंच सूरज जी आम्हाला कायम म्हणायचे आपण बाजूला एका मराठी चित्रपटाचं शूटिंग सुरु करूया. कारण, चित्रपटात बरेच मराठी कलाकार आहेत. माधुरी पूर्ण मराठी आहे. तर सलमानही थोडंफार मराठीतच बोलायचा."

Web Title: actress renuka shahane recalls memories of hum aapke hain koun movie shares work experience with salman khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.