बॉलिवूडच्या या लोकप्रिय अभिनेत्रीने नावात केला मोठा बदल! हिट सिनेमांसाठी नवा उपाय?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 05:13 PM2024-03-05T17:13:07+5:302024-03-05T17:13:47+5:30

अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्रीने तिच्या नावात मोठा बदल केलाय

actress radhika madan change his name adds an extra ‘k’ in her name radhikka madan | बॉलिवूडच्या या लोकप्रिय अभिनेत्रीने नावात केला मोठा बदल! हिट सिनेमांसाठी नवा उपाय?

बॉलिवूडच्या या लोकप्रिय अभिनेत्रीने नावात केला मोठा बदल! हिट सिनेमांसाठी नवा उपाय?

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अक्षय कुमारपासून सध्याच्या कियारा अडवाणीपर्यंत अनेकांनी इंडस्ट्रीत येण्यासाठी त्यांची नावं बदलली आहेत. अशातच सध्या करिअरच्या शिखरावर असताना लोकप्रिय अभिनेत्रीने तिच्या नावात मोठा बदल केलाय. ही अभिनेत्री म्हणजे राधिका मदान. 'पटाखा', 'मर्द को दर्द नही होता', 'अंग्रेझी मिडियम' अशा लोकप्रिय सिनेमांमध्ये काम करणाऱ्या राधिकाने तिच्या नावात काहीसा बदल केल्याची चर्चा आहे.

राधिकाने इंस्टाग्राम हँडलच्या बायोमध्ये आपले नवीन नाव लिहून हा बदल स्पष्ट केला आहे. राधिकाने तिच्या नावाचे स्पेलिंग बदलले आहे. अभिनेत्रीने तिचे संपूर्ण नाव बदलले नाही, तिने फक्त एक अक्षर जोडून नाव थोडेसे बदलले. आता राधिका मदानच्या नावाचे अधिकृत स्पेलिंग Radhika वरून Radhikka असे बदलले आहे. याचा अर्थ असा  राधिकाने तिच्या नावात आणखी एक 'K' जोडला आहे.

करिअरच्या शिखरावर असताना राधिकाने असं का केलं याचं कारण अद्याप समोर आलेले नाही. पण बॉलिवूडची सुपरहिट अभिनेत्री बनण्यासाठी तिने हे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अनेकदा बॉलिवूड स्टार्स ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवून आपल्या करिअरला चालना देण्यासाठी ज्योतिषांच्या सल्ल्याने त्यांच्या नावाची अक्षरे बदलतात. करण जोहर सुद्धा अनेकदा त्याच्या सिनेमांच्या नावात असा बदल करतो. त्यामुळे राधिकानेही ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार नावात बदल केल्याची चर्चा आहे. राधिका लवकरच अक्षय कुमारसोबत 'सरफिरा' सिनेमात झळकणार आहे.

Web Title: actress radhika madan change his name adds an extra ‘k’ in her name radhikka madan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.