'डीडीएलजे'मधली छोटी छुटकी आठवतेय? आता ओळखूही येत नाही; ४४ वर्षांची झाली अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 17:33 IST2025-09-08T17:31:14+5:302025-09-08T17:33:46+5:30

या सिनेमावेळी ती फक्त १३ वर्षांची होती.

actress pooja ruparel played chutki in ddlj how does she look now know more | 'डीडीएलजे'मधली छोटी छुटकी आठवतेय? आता ओळखूही येत नाही; ४४ वर्षांची झाली अभिनेत्री

'डीडीएलजे'मधली छोटी छुटकी आठवतेय? आता ओळखूही येत नाही; ४४ वर्षांची झाली अभिनेत्री

शाहरुख खान (Shahrukh Khan) आमि काजोलच्या (Kajol)  सुपरहिट सिनेमांमध्ये 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चं नाव आवर्जुन येतंच. १९९५साली आलेल्या या सिनेमाने रेकॉर्डतोड कामगिरी केली होती. मुंबईतील मराठा मंदिर थिएटरमध्ये तर हा शो आजही लागतो. या सिनेमात काजोलच्या छोट्या बहिणीच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री आठवतेय का?छुटकी असं तिला म्हणायचे. आता ही अभिनेत्री कशी दिसते बघा

'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'मध्ये छुटकी या भूमिकेत दिसलेली ही अभिनेत्री पूजा रुपारेल. या सिनेमावेळी पूजा रुपारेल फक्त १३ वर्षांची होती. काजोलची बहीण जिला कुलजीत जिजाजी अजिबात आवडत नसतात तर राजच आपला जिजाजी व्हायला पाहिजे असं तिला वाटत असतं. तीच पूजा आज ४४ वर्षांची आहे. पूजाने डीडीएलजे च्या आधीच १९९३ साली 'किंग अंकल'मध्ये काम केलं होतं. त्यातही तिने शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर केली होती. शिवाय शाहरुखच्या 'दिल से' मध्येही ती दिसली. मात्र काही सिनेमे केल्यानंतर पूजाला इंडस्ट्रीत म्हणावं तसं काम मिळालं नाही. तिला टाइपकास्ट केलं गेलं. आज पूजाचा लूक पाहून अनेकांना विश्वासही बसत नाही की तीच छुटकी आहे. 


खूप कमी जणांना माहित आहे की पूजा ही सोनाक्षी सिन्हाची चुलत बहीण आहे. पूजाची आजी आणि सोनाक्षीजी आजी दोघी बहिणी होत्या. पूजाने 'जुबान संभालके','बा बहू और बेबी' या टीव्ही मालिकांमध्येही काम केलं. तसंच तिने स्टॅण्डअप कॉमेडी शोही केले. ती गाणंही गाते. तिचे इन्स्टाग्रामवरील व्हि़डिओ व्हायरल झाले आहेत. 

Web Title: actress pooja ruparel played chutki in ddlj how does she look now know more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.