Video: गाणं तिचं पण चमकला तो! पूजा हेगडेच्या 'मोनिका'वर चिमुकला असा थिरकला की अभिनेत्री बघतच राहिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 17:18 IST2026-02-10T17:14:31+5:302026-02-10T17:18:30+5:30

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या रजनीकांत यांच्या 'कुली' (Coolie) या चित्रपटातील 'मोनिका' हे आयटम साँग प्रचंड गाजले होते. आता याच गाण्यावर एका लहान मुलाने मंचावर पूजा हेगडेला जबरदस्त टक्कर दिली असून, या मुलाच्या डान्सपुढे पूजाची जादूही फिकी पडल्याचे नेटकरी म्हणत आहेत.

actress Pooja Hegde Monica song child dance moves viral on internet at satyabhama university | Video: गाणं तिचं पण चमकला तो! पूजा हेगडेच्या 'मोनिका'वर चिमुकला असा थिरकला की अभिनेत्री बघतच राहिली

Video: गाणं तिचं पण चमकला तो! पूजा हेगडेच्या 'मोनिका'वर चिमुकला असा थिरकला की अभिनेत्री बघतच राहिली

दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे सध्या तिच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या रजनीकांत यांच्या 'कुली' (Coolie) या चित्रपटातील 'मोनिका' हे आयटम साँग प्रचंड गाजले होते. आता याच गाण्यावर एका लहान मुलाने मंचावर पूजा हेगडेला जबरदस्त टक्कर दिली असून, या मुलाच्या डान्सपुढे पूजाची जादूही फिकी पडल्याचे नेटकरी म्हणत आहेत.

गाणं तिचं, पण चमकला तो?

चेन्नईतील सत्यभामा युनिव्हर्सिटीमध्ये एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पूजा हेगडेने प्रमुख पाहुणी म्हणून हजेरी लावली होती. जेव्हा पूजा मंचावर आली, तेव्हा एक लहान मुलगा तिथे पोहोचला आणि त्याने 'मोनिका' गाण्यावर डान्स करण्यास सुरुवात केली. हा मुलगा इतक्या आत्मविश्वासाने आणि कमालीच्या ऊर्जेने डान्स करत होता की, स्वतः पूजा हेगडे देखील त्याला पाहून थक्क झाली.


व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतं की, हा मुलगा गाण्याच्या प्रत्येक बीटवर अचूक स्टेप्स करत आहे. त्याचे डान्स स्टेप्स पाहून पूजाने अनेकदा हसून त्याला दाद दिली आणि काही वेळा ती स्वतः त्याचे स्टेप्स फॉलो करण्याचा प्रयत्न करताना दिसली. मूळ गाण्यात शौबिन साहीरने ज्या प्रकारे डान्स केला होता, अगदी त्याच तोडीचा डान्स या मुलाने केल्यामुळे उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

कोण आहे हा लहान डान्सर?

या मुलाचे नाव 'हानी' असल्याचे समोर आले आहे. प्रसिद्ध डान्सर आणि अभिनेता जाफर सादिक (Jaffer Sadiq) हा या मुलाचा मार्गदर्शक आहे. हानीच्या या डान्सवर जाफर सादिकने इंस्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर करत म्हटले की, "जेव्हा तुम्ही स्वतःच्या कौशल्यावर विश्वास ठेवता, तेव्हा नशीब स्वतःहून तुम्हाला मार्ग दाखवतं. मला तुझा अभिमान आहे."

सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. नेटकरी यावर मजेशीर आणि कौतुकास्पद कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले, "मुलगा चमकला आणि पूजा फक्त पाहतच राहिली." दुसऱ्याने म्हटले की, "या लहान मुलामध्ये एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा जास्त चांगली ऊर्जा आणि डान्स मूव्ह्स आहेत."

Web Title : पूजा हेगड़े के गाने पर बच्चे ने किया कमाल का डांस!

Web Summary : चेन्नई में एक कार्यक्रम के दौरान हानी नामक एक लड़के ने पूजा हेगड़े के गाने 'मोनिका' पर शानदार नृत्य करके सबको प्रभावित किया। लड़के के आत्मविश्वास और नृत्य कौशल की खूब प्रशंसा हो रही है।

Web Title : Little Boy Steals the Show from Pooja Hegde with Dance!

Web Summary : A young boy named Hani impressed Pooja Hegde with his energetic dance moves to her song 'Monica' at a Chennai university event. His performance has gone viral, with many praising his confidence and skills.