चित्रपट न मिळाल्याने पॅक्ड फूड विकू लागली ही अभिनेत्री, आहे कोट्यावधीची मालकीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 08:00 IST2019-10-23T08:00:00+5:302019-10-23T08:00:02+5:30
जगजीत सिंग यांनी गायलेली ‘बडी नाजुक है ये मंजिल’ ही लोकप्रिय गझल आठवत असेल तर चित्रपटातील हिरोईनही तुम्हाला आठवत असेल.

चित्रपट न मिळाल्याने पॅक्ड फूड विकू लागली ही अभिनेत्री, आहे कोट्यावधीची मालकीण
‘जॉगर्स पार्क’ हा चित्रपट तुम्हाला आठवतो? जगजीत सिंग यांनी गायलेली ‘बडी नाजुक है ये मंजिल’ ही लोकप्रिय गझल असलेला हा चित्रपट आठवत असेल तर यातली हिरोईनही तुम्हाला आठवत असेल. तिचे नाव पेरीजाद जोराबियन. आज (23 ऑक्टोबर) पेरिजादचा वाढदिवस.
‘जॉगर्स पार्क’ या सिनेमात पेरिजाद मुख्य भूमिकेत होती. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही. पण या चित्रपटाच्या निमित्ताने पेरीजादच्या रूपात एक सुंदर अभिनेत्री बॉलिवूडला मिळाली. अर्थात ती आली आणि आली तशीच अचानक गायबही झाली.
2001 मध्ये ‘बॉलिवूड कॉलिंग’ या चित्रपटातून तिने पदार्पण केले. पण तिला खरी ओळख दिली ती ‘जॉगर्स पार्क’ या सिनेमाने.
ग्लॅमर जगापासून दूर गेलेली ही अभिनेत्री सध्या काय करते, हे तुम्हाला ठाऊक आहे? नसेल तर आम्ही सांगतो. होय, बॉलिवूडला रामराम ठोकणारी ही हिरोईन सध्या खाण्यापिण्याचे पदार्थ विकते. आश्चर्य वाटले ना, पण हे खरे आहे.
पहिल्या चित्रपटानंतर पेरिजादला आणखीही काही चित्रपट मिळाले. पण तिचे चित्रपट फार कमाल दाखवू शकले नाहीत. छोट्या पडद्यावरही तिने नशीब आजमावले. पण इथेही यशाने तिला हुलकावणी दिली. मग अचानक तिने ग्लॅमर दुनियेला अलविदा म्हणण्याचा निर्णय घेतला. यानंतर तिने ‘जोराबियन’ नावाचे पॅक्ड फूड ब्रँड लॉन्च केले. तिचा हा ब्रँड पॅक्ड चिकन विकतो.
पेरिजाद सध्या या बिझनेसमध्ये रमलीय आणि आपल्या पतीसोबत आनंदी आहे. चित्रपटात परतण्याचा तिचा कुठलाही इरादा नाही.
2006 मध्ये पेरिजादने बिझनेसमॅन बोमन रूस्तम इराणीसोबत लग्न केले. मुंबईत तिचे एक रेस्टॉरंटही आहे.