'या' मराठी अभिनेत्रीने ऋषी कपूर यांच्यासोबत किसींग सीनला दिलेला नकार, जिंकलेली फिल्मफेअर अवॉर्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 17:15 IST2025-08-02T17:14:30+5:302025-08-02T17:15:38+5:30
राज कपूर दिग्दर्शित हा सिनेमा ज्यात एकही बोल्ड सीन नव्हता.

'या' मराठी अभिनेत्रीने ऋषी कपूर यांच्यासोबत किसींग सीनला दिलेला नकार, जिंकलेली फिल्मफेअर अवॉर्ड
अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांनी ७०-८० च्या दशकात अनेक हिट सिनेमे दिले. कित्येक अभिनेत्रींसोबत त्यांची केमिस्ट्री गाजली.'बॉबी', 'कर्ज','एक मै और एक तू' अशा एकापेक्षा एक सिनेमांनी त्यांनी इंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांच्या रोमँटिक भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस पडायच्या. ऋषी कपूर यांच्यासोबत एका मराठी अभिनेत्रीनेही काम केलं होतं. त्यावेळी तिने त्यांच्यासोबत किसींग सीन द्यायला स्पष्ट नकार दिला होता. कोण आहे ती अभिनेत्री?
१९८२ साली आलेला 'प्रेम रोग' सिनेमा आठवतोय? ऋषी कपूर यांचे वडील राज कपूर दिग्दर्शित हा सिनेमा ज्यात एकही बोल्ड सीन नव्हता. नाही तर तेव्हा राज कपूर यांच्या प्रत्येक सिनेमात एखादा तरी किसींग सीन असायचाच. 'प्रेम रोग'मध्ये त्यांना ऋषी कपूर आणि यातली अभिनेत्री ती म्हणजे पद्मिनी कोल्हापुरे (Padmini Kolhapure) यांचा किसींग सीन हवा होता. मात्र पद्मिनी कोल्हापुरेंनी राज कपूर यांना स्पष्ट नकार दिला होता. पद्मिनीने सिनेमात विधवा मुलीची भूमिका साकारली होती. अगदी कमी वयात तिच्या पतीचं निधन झालेलं असतं. पद्मिनीने ही भूमिका खूप चांगली निभावली होती. ऋषी कपूर आणिया पद्मिनी कोल्हापुरेंचा हा अतिशय उत्कृष्ट सिनेमा होता.
पद्मिनी कोल्हापुरे या सिनेमावेळी केवळ १७ वर्षांच्या होत्या. इतक्या कमी वयात त्यांनी साकारलेली विधवेची भूमिका सर्वांच्या कायम लक्षात राहणारी होती. त्यांना यासाठी फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला होता. याचाच आणखी एक किस्सा सांगताना पद्मिनी कोल्हापुरे एका मुलाखतीत म्हणालेल्या की, "सिनेमातला एक सीन परफेक्ट होण्यासाठी राज कपूर यांनी माझे खूप रिटेक्स घेतले होते. त्यात मी ऋषी कपूरला ७-८ वेळा थोबाडीत मारली होती. माझ्यासाठी ते करणं खूप कठीण होतं."