अभिनेत्री निकिता दत्ताला कोरोनाची लागण, आईचीही टेस्ट पॉझिटिव्ह; म्हणाली, "आशा आहे की..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 09:11 IST2025-05-23T09:10:37+5:302025-05-23T09:11:42+5:30
निकिता दत्ता आणि तिची आई सध्या घरीच क्वारंटाईन आहेत. तर दुसरीकडे शिल्पा शिरोडकरनेही दिली हेल्थ अपडेट

अभिनेत्री निकिता दत्ताला कोरोनाची लागण, आईचीही टेस्ट पॉझिटिव्ह; म्हणाली, "आशा आहे की..."
Nikita Dutta corona Positive: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मुंबईतही काही रुग्णांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने (Shilpa Shirodkar) तिला कोरोना झाल्याची माहिती दिली होती. तर आता 'घरत गणपती' फेम अभिनेत्री निकिता दत्ता (Nikita Dutta) आणि तिच्या आईलाही कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. तिनेच सोशल मीडियावर याविषयी माहिती दिली.
निकिता दत्ताचा 'ज्वेल थीफ' सिनेमा नुकताच नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. यामध्ये ती सैफ अली खान आणि जयदीप अहलावतसोबत दिसली. आता ती कोरोना पॉझिटिव्ह झाली आहे. रिपोर्टचा फोटो शेअर करत तिने लिहिले, "मला आणि आईला कोरोना झाला आहे. हा फार काळ राहणार नाही अशी आशा आहे. छोट्या क्वारंटाईन ब्रेकनंतर पुन्हा भेटूच. सुरक्षित राहा."
शिल्पा शिरोडकरने दिली हेल्थ अपडेट
शिल्पा शिरोडकर आता कोरोनातून बरी झाली आहे. तिने इन्स्टाग्रामवर शेअर करत लिहिले, "अखेर मी कोरोनातून बाहेर आले आहे. बरं वाटतंय. तुमच्या प्रेमासाठी धन्यवाद."
मनोरंजनविश्वात हळूहळू कोरोनाच्या केसेस आढळून येत असतानाच मुंबईत रुग्णांची संख्या ९५ वर पोहोचली आहे. त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांनी सर्वांना मास्क घालण्याचा आणि सुरक्षित अंतर राखण्याचा सल्ला दिला आहे.