'या' अभिनेत्रीने एका वर्षात २३ किलो वजन केलं कमी, लवकरच करतेय बिग स्क्रीनवर कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 03:23 PM2024-07-11T15:23:05+5:302024-07-11T15:23:42+5:30

वजन कमी करणं हे केवळ चांगलं दिसण्यासाठी नव्हे तर...

actress Neha Dhupia lost 23 kg in a year after giving birth to two children | 'या' अभिनेत्रीने एका वर्षात २३ किलो वजन केलं कमी, लवकरच करतेय बिग स्क्रीनवर कमबॅक

'या' अभिनेत्रीने एका वर्षात २३ किलो वजन केलं कमी, लवकरच करतेय बिग स्क्रीनवर कमबॅक

बॉलिवूडमध्ये अभिनेत्री फिटनेस फ्रीक असतात. त्यांना वजन वाढलं तर सिनेमांच्या ऑफर्स येणं कमी होईल ही भीती असते. तसंच काही अभिनेत्री आधीपासूनच व्यायाम, डाएट याकडे कटाक्षाने लक्ष देतात. मात्र प्रेग्नंसीनंतर वजन वाढणं हे तसं साहजिकच आहे. तरी काही अभिनेत्री प्रेग्नंसीनंतरही अगदी स्लीम ट्रीम होतात. नुकतंच एका अभिनेत्रीने गेल्या वर्षभरात तब्बल २३ ते २५ किलो वजन कमी करुन दाखवलं आहे. कोण आहे ती अभिनेत्री आणि काय आहे तिचा फिटनेस फंडा?

मोजक्याच सिनेमांमध्ये दिसलेली ही अभिनेत्री आहे नेहा धुपिया (Neha Dhupia). सध्या नेहा सेलिब्रिटींच्या मुलाखती घेते. नेहाने 2018 साली अंगद बेदीशी लग्न केले. त्याचवर्षी तिने मुलीला जन्म दिला. तर 2021 साली तिला मुलगा झाला. नेहाचं कुटुंब पूर्ण झालं. दरम्यान तिचं वजन कमालीचं वाढलं होतं. पण आता ती अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. गेल्या वर्षी नेहाने २३ किलो वजन कमी करुन दाखवलं आहे. तिचं हे ट्रान्सफॉर्मेशन थक्क करणारं आहे.

या प्रवासाबद्दल नेहा म्हणाली, "आई होणं हा विलक्षण अनुभव आहे. मात्र यानंतरचं आव्हान ते म्हणजे वाढलेलं वजन. काही किलो वजन कमी करणं हे केवळ चांगलं दिसण्यासाठी नव्हे तर आणखी स्ट्राँग होण्यासाठी गरजेचं होतं. मला माझ्या मुलांसाठीच एक उदाहरण ठेवायचं होतं की स्वत:चीही काळजी घेणं किती महत्वाचं आहे. नियमित व्यायाम गरजेचा आहे. तसंच संध्याकाळी ७ पर्यंत जेवण झालंच पाहिजे. तर सकाळी मी नवऱ्यासोबत ११ वाजता नाश्ता करते.  यामुळे डाएट नियंत्रित राहतं. आम्हाला घरात सर्वांनाच ही सवय लागली आहे. तुम्ही किती वेगाने करताय याला महत्व नसून यातून काय रिझल्ट येतो हे महत्वाचं आहे."

नेहा धुपिया आगामी 'बॅड न्यूज' या विकी कौशल आणि तृप्ती डिमरीच्या सिनेमात दिसणार आहे. बऱ्याच काळाने ती मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे. नेहाचा यामध्ये कॅमिओ आहे.

Web Title: actress Neha Dhupia lost 23 kg in a year after giving birth to two children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.