"त्याने माझं तोंड पकडलं अन्...", लोकप्रिय अभिनेत्रीबरोबर सेटवर घडलेला धक्कादायक प्रकार, म्हणाली-"मला खूप..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 10:06 IST2025-11-07T10:01:38+5:302025-11-07T10:06:17+5:30
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीसोबत घडलेला भयंकर प्रकार, म्हणाली-"मी पळत सुटले..."

"त्याने माझं तोंड पकडलं अन्...", लोकप्रिय अभिनेत्रीबरोबर सेटवर घडलेला धक्कादायक प्रकार, म्हणाली-"मला खूप..."
Mouni Roy: टीव्हीवरून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणारी अभिनेत्री मौनी रॉय आज फिल्म इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. 'गोल्ड', 'केजीएफ-१','ब्रम्हास्त्र' आणि 'लव्ह सेक्स और धोखा' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये मौनी झळकली आहे. मौनी रॉय तिच्या अभिनयासह सोशल मीडियावरील फोटो,व्हिडीओंमुळे देखील तितकीच चर्चेत असते. त्यात आता ही अभिनेत्री तिने सांगितलेल्या एका घटनेमुळे चर्चेत आली आहे. मौनी २१ वर्षांची असताना एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, तिच्यासोबत हा भयंकर प्रकार घडला होता असं तिने सांगितलं.
'स्पाइस इट अप विद अपूर्वा मखीजा'ला दिलेल्या मुलाखतीत मौनी रॉयने एका चित्रपटाच्या सेटवर गेल्यानंतर तिच्यासोबत हा घडलेला प्रकार सांगितला. त्याबद्दल सांगताना ती म्हणाली, "त्यावेळी मी साधारण २१-२२ वर्षांची होते. त्यामध्ये एक सीन होता, जेव्हा एक मुलगी स्विमिंग पूलमध्ये पडते, बेशुद्ध होते आणि मुख्य नायक तिला जिवंत करण्यासाठी तोंडाला तोंड लावून तिला श्वास देतो."
पुढे मौनीने म्हटलं की यानंतर जे काही घडलं ते त्यामुळे मला धक्काच बसला. तो प्रसंग शेअर करताना मग ती म्हणाली, "त्या माणसाने माझा चेहरा अक्षरशः धरला आणि मला तोंडाला तोंड लावून श्वास देण्याचा प्रयत्न करत होता. त्या क्षणी मला काय झालं ते समजलं सुद्धा नाही.मी थरथर कापत होते आणि खाली पळत सुटले. यामुळे मला खूप जास्त धक्का बसलेला". दरम्यान,या घडलेल्या प्रकाराबद्दल सांगताना मौनीने कोणाचंही नाव उघडपणे घेतलं नाही.
मौनी रॉयच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच ती डेविड धवन यांच्या 'है जवानी तो इश्क होना है'या चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. या चित्रपटात मृणाल ठाकूर,पूजा हेगडे या मातब्बर नायिका देखील तिच्यासोबत आहेत.