बिकीनीमध्ये 38 वर्षीय अभिनेत्रीने दाखवली झीरो फिगर, पतीसोबत स्वीमिंग पूलमध्ये झाली इंटिमेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 16:04 IST2024-01-03T16:03:13+5:302024-01-03T16:04:13+5:30

व्हिडिओमुळे अभिनेत्री ट्रोल होत आहे

actress Mouni Roy intimate with husband sooraj celebrates new year in sexy way | बिकीनीमध्ये 38 वर्षीय अभिनेत्रीने दाखवली झीरो फिगर, पतीसोबत स्वीमिंग पूलमध्ये झाली इंटिमेट

बिकीनीमध्ये 38 वर्षीय अभिनेत्रीने दाखवली झीरो फिगर, पतीसोबत स्वीमिंग पूलमध्ये झाली इंटिमेट

झिरो फिगर, कातिल अंदा आणि मस्त अंदाज या कारणांमुळे 38 वर्षीय अभिनेत्री सध्या चर्चेत आहे. टीव्हीवरील निगेटिव्ह भूमिकांसाठी ही अभिनेत्री प्रसिद्ध आहे. पण नुकत्याच एका व्हिडिओत ती पतीसोबत स्वीमिंग पूलमध्ये इंटिमेट झालेली दिसत आहे. तिच्या या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर तिला चांगलंच ट्रोल केलं जात आहे.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून मौनी रॉय (Mouni Roy) आहे. मौनी पती सूरज नांबियारसोबत नेहमीच फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असते. नुकतंच नववर्षाचं स्वागत करताना तिने असा काही व्हिडिओ पोस्ट केला ज्यामुळे ती ट्रोल झाली. या व्हिडिओत मौनीने फ्लोरल प्रिंटेड काळी बिकीनी घातली आहे तर तिचा पती सूरज नांबियार स्वीमिंग पूलमध्ये उतरलेला दिसत आहे. मौनीच्या किलर लूकने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय. दरम्यान मौनीने घेतलेला व्हिडिओ सेल्फी फारच इंटिमेट असून यामुळेच नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे.

या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत लिहिले, 'काहीतरी लाज वाटू दे', 'पूर्ण कपडे घालायला कधी शिकणार?', 'अरे स्वत:च्या इज्जतीची काळजी आहे की नाही.' मौनीला अशा कमेंट्समुळे नेटकऱ्यांनी चांगलंच धारेवर धरलं आहे. मात्र तिने याकडे दुर्लक्ष करत पतीसोबत क्वॉलिटी टाईम घालवला आहे. याची झलक तिने या पोस्टमधून दाखवली आहे.

2022 मध्ये मौनी आणि सूरज लग्नबंधनात अडकले. मौनी 'नागिन' मालिकेमुळे घराघरात पोहोचली. याशिवाय तिला 'देवो के देव महादेव' मालिकेने ओळख दिली. मौनी 'ब्रम्हास्त्र' सिनेमातही खलनायिकेच्या भूमिकेत दिसली. सध्या ती आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे.

Web Title: actress Mouni Roy intimate with husband sooraj celebrates new year in sexy way