Mahalakshmi Marriage: 'फोटो' मुळे मोडलं साऊथच्या अभिनेत्रीचं दुसरं लग्न?, तिनंच सांगितलं नात्याचं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 16:17 IST2023-05-27T16:14:54+5:302023-05-27T16:17:52+5:30
आता अभिनेत्रीच्या या दुसऱ्या लग्नातसुद्धा अडचणी येत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर आता अभिनेत्रीचं भाष्य केलं आहे.

Mahalakshmi Marriage: 'फोटो' मुळे मोडलं साऊथच्या अभिनेत्रीचं दुसरं लग्न?, तिनंच सांगितलं नात्याचं सत्य
साऊथ अभिनेत्री महालक्ष्मीने गेल्यावर्षी दिग्दर्शक रवींद्र चन्द्रशेखरसोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधत सर्वानांच चकित केलं होतं. सोशल मीडियावर या दोघांच्या जोडीचं अनेकांनी कौतुक केलेलं तर काहींनी त्यांना ट्रोल केलं होतं. महालक्ष्मी वरचेवर पती रवींद्रसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
आता अभिनेत्रीच्या या दुसऱ्या लग्नातसुद्धा अडचणी येत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. इतकंच नाही तर लग्नाच्या काही महिन्यांतच महालक्ष्मी आणि रवींद्र हे एकमेकांपासून विभक्त झाल्याचं म्हटलं जात आहे. यावर अभिनेत्रीने पती रवींद्रसोबतच एक फोटो शेअर करत या केवळ अफवा असल्याचं म्हटलं आहे.
अभिनेत्रीने लिहिलंय, 'डिअर पुरुषा तुला किती वेळा सांगायचं तुझ्या एकट्याचा फोटो अपलोड करु नको. कारण त्यांनंतर सोशल मीडियावर आपल्या विभक्त झाल्याच्या चर्चा सुरु होतात. तू पुन्हा पुन्हा तीच चूक करतोस. यावरुन हे जोडपं सुखाने संसार करत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
महालक्ष्मीचे दुसऱ्यांदा एका निर्मात्याशी लग्न झाले आहे. याआधी अभिनेत्रीने अनिल नेरेदिमिलीसोबत लग्न केलं होतं. तो आधीच विवाहित होता आणि त्याला एक मूलही आहे. याच दरम्यान, दोघांमध्ये अनेक वाद झाले. रिपोर्ट्सनुसार, या वादांमध्ये निर्माता रविंद्र चंद्रशेखरन यांनी त्यांना खूप पाठिंबा दिला होता. दरम्यान, प्रेमात फसवणूक झालेली अभिनेत्री त्याच्या खूप जवळ आली होती. नंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या वर्षी म्हणजे सप्टेंबर 2022 मध्ये दोघांनी लग्न केले.