"सूर्यकुमार मला मेसेज करायचा...", क्रिकेटपटूबद्दल 'ते' वक्तव्य करणं अभिनेत्रीला महागात पडलं, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 11:36 IST2026-01-16T11:33:02+5:302026-01-16T11:36:05+5:30
सूर्यकुमार यादवबद्दलच्या वक्तव्यामुळे मोठा वाद! अभिनेत्री विरोधात कारवाई होणार? म्हणालेली-" तो खूप मेसेज करायचा..."

"सूर्यकुमार मला मेसेज करायचा...", क्रिकेटपटूबद्दल 'ते' वक्तव्य करणं अभिनेत्रीला महागात पडलं, नेमकं काय घडलं?
Bollywood Actress Khushi Mukerjee: भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव हा आपल्या आक्रमक खेळीसाठी ओळखला जातो. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने एकही सामना गमावलेला नाही. मात्र, मागील काही दिवसांपासून हा क्रिकेटपटू एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. अलिकडेच एका अभिनेत्रीने सूर्यकुमार यादवबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ही अभिनेत्री म्हणजे खुशी मुखर्जी. क्रिकेटपटूबद्दल तिला वादग्रस्त वक्तव्य करणं आता चांगलंच महागात पडलं आहे. याप्रकरणी आता अभिनेत्रीविरोधात एका सोशल मिडिया इन्फ्लूएन्सरने तक्रार दाखल केली आहे.
आपली हटके स्टाईल आणि फॅशनमुळे चर्चेत राहणारी खुशी अनेकदा तिच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत येत असते. त्यात काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत संभाषणादरम्यान खळबळजनक दावा केला होता.“सूर्यकुमार यादव मला सतत मेसेज करायचा” असं वक्तव्य करत मोठा गौप्यस्फोट केला होता.हे प्रकरण तिच्या अंगाशी आलं आहे. क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवचा समर्थक सोशल मिडिया इन्फ्लूएन्सर फैजान अन्सारीने तिच्याविरोधात १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. याची तक्रार गाझीपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
मुळचा मुंबईचा रहिवासी असलेल्या फैजान अन्सारीने गाझीपूर गाठत अभिनेत्री विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अन्सारीच्या म्हणण्यांनुसार, खुशीने केलेले सर्व दावे हे खोटे असून तिच्या या वक्तव्यामुळे सुर्यकुमार यादवची बदनामी झाली आहे. अभिनेत्रीने प्रसिद्धी मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक त्याच्याबद्दल बदनामीकारक विधान केलं आणि ज्यामुळे एका राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटूच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचल्याचं त्याचं म्हणणं आहे.
अभिनेत्री नेमकं काय म्हणालेली?
खुशी म्हणाली, "मला कोणत्याही क्रिकेटरला डेट करायचं नाही. अनेक क्रिकेटर्स माझ्या मागे लागले होते. सूर्यकुमार यादव मला खूप मेसेज करायचा. पण आता आमच्यात फार बोलणं होत नाही. मला माझं नाव त्याच्यासोबत जोडलेलं नकोय". खुशीच्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, कालांतराने तिने आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, असं स्पष्टीकरण सुद्धा दिलं होतं.
खुशी मुखर्जीने आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. खुशीने तिच्या करिअरच्य सुरुवातीला साऊथ चित्रपटांमध्ये काम करत आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली.