सूर्यकुमार यादवबद्दल बोलली अन् फसली! १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्यानंतर अभिनेत्रीने दिलं स्पष्टीकरण, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 10:23 IST2026-01-21T10:20:13+5:302026-01-21T10:23:06+5:30
सूर्यकुमार यादवबद्दल धक्कादायक वक्तव्य! १०० कोटींच्या मानहानीचा दावा दाखल झाल्यानंतर अभिनेत्री आता म्हणते-"लोक उगाच…"

सूर्यकुमार यादवबद्दल बोलली अन् फसली! १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्यानंतर अभिनेत्रीने दिलं स्पष्टीकरण, म्हणाली...
Khushi Mukerjee Reaction: अभिनेत्री, मॉडेल खुशी मुखर्जी मागील काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर सूर्यकुमार यादवबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात सापडली. खुशी मुखर्जीने एका मुलाखतीदरम्यान, सूर्यकुमार मला मेसेज करायचा", असा दावा केला होता. त्यानंतर अभिनेत्रीविरोधात इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारीने १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. आता अभिनेत्रीने या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडलं आहे.
खुशी मुखर्जीने केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर ही लढाई थेट कायदेशीर वळणावर पोहोचली आहे. अलिकडेच 'इन्स्टंट बॉलिवूड'ला दिलेल्या मुलाखतीत खुशीने मानहानीचा दावा आणि सोशल मीडियावर सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. शिवाय हा एक पब्लिसिटी स्टंट' असल्याचं तिने म्हटलं आहे. दरम्यान, या मुलाखतीमध्ये संपूर्ण प्रकरणावर भाष्य करत खुशी मुखर्जी म्हणाली,"माझ्या तोंडून ते वाक्य निघालं की आम्ही एकमेकांशी बोलायचो. मात्र, पण मला वाटत नाही की मी असं काही बोलले ज्यामुळे कोणाचीही बदनामी होईल.या परिस्थितीचा काही लोकांनी फायदा घेतला."
त्यानंतर खुशी म्हणाली, "मला कोणतीही कायदेशीर नोटीस मिळालेली नाही. लोक उगाच या गोष्टी वाढवून सांगत आहेत. यात काय चूक आहे? आम्ही फक्त बोलत होतो, इतकंच. मी कोणाचीही बदनामी केलेली नाही.
दरम्यान, एका मुलाखतीत खुशी मुखर्जीला विचारण्यात आलं होतं की तिला एखाद्या क्रिकेटपटूला डेट करायला आवडेल का? यावर खुशी उत्तर देत म्हणालेली, अनेक क्रिकेटपटू तिच्या मागे लागले असले तरी, तिला कोणत्याही क्रिकेटपटूला डेट करायचे नाही.सूर्यकुमार यादव पूर्वी तिला मेसेज करायचा, पण आता ते बोलत नाहीत. खुशी मुखर्जीच्या या वक्तव्याची चाहत्यांसह सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती.