ईशा देओलचाही घटस्फोट? 'त्या' पोस्टनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण, डिटेल्स समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 09:33 AM2024-01-17T09:33:33+5:302024-01-17T09:34:44+5:30

२०१२ साली ईशा आणि भरत तख्तानी लग्नबंधनात अडकले होते.

Actress Esha Deol s divorce with husband Bharat Takhtani rumours spread on social media know details | ईशा देओलचाही घटस्फोट? 'त्या' पोस्टनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण, डिटेल्स समोर

ईशा देओलचाही घटस्फोट? 'त्या' पोस्टनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण, डिटेल्स समोर

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मोठी मुलगी ईशा देओलच्या (Esha Deol) घटस्फोटाची चर्चा अचानक सुरु झाली होती. ईशा पती भरत तख्तानीपासून (Bharat Takhtani) वेगळी होत असल्याची चर्चा सुरु आहे. ईशाने बऱ्याच काळापासून भरतसोबत एकही फोटो शेअर केलेला नाही. तसंच तिचे अनेक फोटो हेमा मालिनीसोबत दिसले आहेत. अशात आता नेटकरीही ती घटस्फोट घेत आहे का असा अंदाज वर्तवत आहेत. 

बॉलिवूडमध्ये लग्नाचं वारं वाहत आहे तसंच घटस्फोटाचंही वाहत आहे. 'खल्लास गर्ल' अभिनेत्री ईशा कोप्पिकरचा 14 वर्षांचा संसार मोडला आहे. त्यातच आता ईशा देओलच्याही घटस्फोटाच्याही चर्चा सुरु झाल्या आहेत. पती पत्नीमध्ये बिनसलं असल्याची बातमी मनोरंजनसृष्टीत वाऱ्यासारखी पसरत आहे. गेल्या वर्षी सणासुदीला जेव्हा ईशाला केवळ हेमा मालिनीसोबत पाहिले गेले तेव्हाच या चर्चा सुरु झाल्या होत्या. शिवाय आमिर खानची लेक आयरा खानच्या रिसेप्शनमध्ये ईशा हेमा मालिनी आणि बहिणीसोबतच दिसली. तसंच दिवाळी पार्ट्यांमध्येही ती एकटीच दिसली. मात्र त्याआधी ती पती भरत तख्तानीसोबत दिसायची. इतकंच नाही हेमा मालिनी यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला भरत येऊ शकला नाही. यामुळे दोघांमध्येही काहीतरी बिनसलं असल्याची चर्चा सुरु झाली.  तसंच भरतला एका मुलीसोबत बघितले गेले असून ती त्याची गर्लफ्रेंड असल्याचं एका युझरने सोशल मीडियावर पोस्ट केलं. ती बँगलोरची असल्याचंही त्याने लिहिलं. यानंतर सोशल मीडियावर भरतला ट्रोल केलं गेलं.

खरं काय आहे?

ईशा आणि भरत यांच्यात खरंच घटस्फोट होतोय का याबाबत त्यांच्या निकटवर्तियांनी सांगितले की,'ईशा आणि भरत वेगळे होत असल्याच्या चर्चा खोट्या आहेत. जून 2023 मध्ये दोघांनी लग्नाचा 11 वा वाढदिवस साजरा केला. सोबतच ईशाने पतीसोबतचा रोमँटिक मोनोक्रोम फोटोही शेअर केला. 

ईशा आणि भरत तख्तानी 2012 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. त्यांच्या ग्रँड वेडिंगमध्ये संपूर्ण देओल कुटुंब खूश होतं. ईशाची पाठवणी करताना धर्मेंद्र यांचे डोळे पाणावले होते. लग्नाची मनोरंजनसृष्टीत खूप चर्चा झाली. त्यांना राध्या आणइ मिराया या मुली आहेत. 

Web Title: Actress Esha Deol s divorce with husband Bharat Takhtani rumours spread on social media know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.