"त्याने शर्टमध्ये हात घातला अन्...", अभिनेत्रीसोबत दिग्दर्शकाचं घाणेरडं कृत्य, म्हणाली- "मला हॉटेलमध्ये बोलवून..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 12:55 IST2025-10-27T12:43:02+5:302025-10-27T12:55:27+5:30
"त्याने शर्टमध्ये हात घातला...", अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव

"त्याने शर्टमध्ये हात घातला अन्...", अभिनेत्रीसोबत दिग्दर्शकाचं घाणेरडं कृत्य, म्हणाली- "मला हॉटेलमध्ये बोलवून..."
Bollywood Actress: अभिनयाचं विश्व दूरून जितकं ग्लॅमरस दिसतं तितकंच त्याचं पडद्यामागचं वास्तव भीषण आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचे अनेक प्रकार समोर येतात. या क्षेत्रात काम करणारे कलाकार याबाबत बोलताना दिसतात. अभिनय क्षेत्रातील अनेक अभिनेते, अभिनेत्रींनी त्यांना आलेल्या या वाईट अनुभवांवर भाष्य केलं आहे. आता अभिनेत्री, सोशल मिडिया इन्फ्ल्यूएन्सर म्हणून ओळखली जाणाऱ्या डॉली सिंगने तिच्या बाबतीत घडलेला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव शेअर केला आहे.
१९ वर्षांची असताना अभिनेत्री डॉली सिंगसोबत हा प्रकार घडला होता. एका मिटिंगच्या बहाण्याने बोलवून दिग्दर्शकाने तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचं तिने एका मुलाखतीत सांगितलं आहे. नुकतीच डॉलीने झुमला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने या घडलेल्या प्रसंगाविषयी खुलासा केला. तेव्हा ती म्हणाली, "जेव्हा मी दिल्ली माझ्या करिअरच्या सुरुवातीलाच अभिनय क्षेत्रात काम करण्याची संधी शोधत होते. त्याचदरम्यान, माझी एका कास्टिंग दिग्दर्शकाशी भेट झाली. ते सुरुवातीला माझ्याशी सारखे फोनवर बोलायचे, जे तिला थोडं विचित्र वाटलं. पण, नवीन असल्यामुळं तुम्ही जर प्रतिसाद न दिल्यास संधी जाईल. असं वाटत असतं."
त्यानंतर पुढे अभिनेत्रीने सांगितलं,"एक महिला म्हणून जेव्हा एखादा माणूस तुम्हाला ऑफर देतो तेव्हा ते समजणं कठीण असते.तो केवळ तुमच्या टॅलेंटमुळे किंवा इतर काही कारणाने तुम्हाला ही ऑफर देत आहे हे आपल्याला माहित नसतं. ते जे काही घडत होतं ते खूप गोंधळात टाकणारं होतं. तो मला फोनवर फोन करायचा, ऑडिशन आणि व्यवस्थेबद्दल सांगायचा आणि मग म्हणायचा, 'उद्या या हॉटेलमध्ये ये; मी तुला एका निर्मात्याशी ओळख करून देतो."
नेमकं काय घडलेलं?
"त्याने मला एका मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये नेलं. मी रेस्टॉरंटमध्ये बसले होते.मी मद्यपान करत नाही. त्यामुळे एकाच ठिकाणी बसून होते. तो दिग्दर्शक ड्रिंक करत होता.त्यानंतर आम्ही एका माणसाची वाट बघत गाडीत बसलो होतो. अचानक त्याने मला किस केलं आणि माझ्या शर्टखाली हात घालण्यास सुरुवात केली.मला काय करावं हेच कळत नव्हतं. त्यावेळी माझं वय फक्त १९-२० वर्ष इतकं होतं तर तो माणूस ३०-४० वर्षांचा होता. मी त्याला जोरात धक्का दिला. पण, त्याक्षणी मी पूर्णपणे गोंधळले होते,काहीच समजत नव्हतं. पळूनही जाऊ शकत नव्हते. मी तिथेच बसून राहिले त्याला मेट्रो स्टेशनवर सोडायला सांगितलं. हे सगळं माझ्यासाठी अनपेक्षित होतं."
डॉली सिंगच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने 'थँक यू फॉर कमिंग' आणि 'डबल XL' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे,