करीना नाहीतर 'जब वी मेट'मध्ये दिसली असती 'ही' बॉलिवूड अभिनेत्री; या कारणामुळे झाली रिप्लेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 15:18 IST2024-10-16T15:12:54+5:302024-10-16T15:18:23+5:30
करीना कपूर आणि शाहिद कपूर स्टारर 'जब वी मेट' या चित्रपटाने प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.

करीना नाहीतर 'जब वी मेट'मध्ये दिसली असती 'ही' बॉलिवूड अभिनेत्री; या कारणामुळे झाली रिप्लेस
Jab We Met Movie : इम्तियाज अली दिग्दर्शित 'जब वी मेट' हा सिनेमा सुपहिट ठरला. शाहिद-करीनाच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. २००७ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने चाहत्यांना वेड लावलं होतं. या चित्रपटातील करीना आणि शाहिदची जोडी प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस उतरली होती. परंतु या चित्रपटासाठी करीना नाही तर दुसऱ्याच एका अभिनेत्रीला विचारणा करण्यात आली होती. ही अभिनेत्री म्हणजे भूमिका चावला आहे.
आर जे सिध्दार्थ कन्ननला दिलेल्या एका मुलखतीत भूमिका चावलाने याबाबत खुलासा केला होता. सलमान खानचा सुपरहिट सिनेमा 'तेरे नाम'मुळे अभिनेत्री भूमिका चावला नावारुपाला आली. या चित्रपटात 'निर्जरा'ची व्यक्तिरेखा साकारून ती लोकप्रिय झाली. त्यादरम्यान मुलाखतीत अभिनेत्रीने 'जब वी मेट'मध्ये तिची रिप्लेसमेंट करण्यात आली तेव्हा प्रचंड निराश झाली होती, असं तिने सांगितलं.
या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, "मला फक्त एका गोष्टीचं वाईट वाटलं जेव्हा मी 'जब वी मेट' चित्रपट साईन करूनही त्यात काम करता आलं नाही. तेव्हा मी बॉबी देओलसोबत स्क्रिन शेअर करणार होते. शिवाय चित्रपटाला 'ट्रेन' हे नाव देण्यात आलं होत. असं करताना शाहिद कपूर आणि मी त्यानंतर आयेशा टाकिया आणि मग करिनाला कन्फर्म करण्यात आलं. मला फक्त या गोष्टीचं प्रचंड वाईट वाटलं होतं. पण मी त्याचा विचार न करता आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. आता मी या गोष्टींचा जास्त विचार करत नाही".