"मी सध्या सिंगल आहे..."; नॅशनल टीव्हीवर 'या' अभिनेत्रीने विजय देवराकोंडाला केलेलं प्रपोज, अभिनेत्याने दिलं 'असं' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 11:03 IST2026-02-26T11:01:27+5:302026-02-26T11:03:09+5:30

बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने विजयला नॅशनल टेलिव्हिजनवर प्रपोज करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी विजयने तिच्या प्रपोजची मागणी थेट धुडकावून लावली होती.

actress ananya panday proposed to Vijay Deverakonda on National TV | "मी सध्या सिंगल आहे..."; नॅशनल टीव्हीवर 'या' अभिनेत्रीने विजय देवराकोंडाला केलेलं प्रपोज, अभिनेत्याने दिलं 'असं' उत्तर

"मी सध्या सिंगल आहे..."; नॅशनल टीव्हीवर 'या' अभिनेत्रीने विजय देवराकोंडाला केलेलं प्रपोज, अभिनेत्याने दिलं 'असं' उत्तर

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवराकोंडा आणि बॉलीवूड अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. मात्र, याच दरम्यान विजय देवराकोंडाचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने विजयला नॅशनल टेलिव्हिजनवर प्रपोज करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी विजयने तिच्या प्रपोजची मागणी थेट धुडकावून लावली होती. ही अभिनेत्री होती अनन्या पांडे.

काय आहे त्या व्हिडिओमध्ये?

हा व्हायरल व्हिडिओ 'लायगर' (Liger) चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचा आहे. कॉफी विथ करण या रिअॅलिटी शोमध्ये गप्पा मारताना अनन्या पांडेने मजेशीर शैलीत विजयबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. ''तू माझ्यावर कधी लाइन नाही मारलीस?'', असं अनन्या विजयला विचारते. पुढे विजय तिला म्हणतो, ''तू तेव्हा रिलेशनशिपमध्ये होती''. त्यावर अनन्या म्हणते, ''ठीक आहे. पण सध्या मी सिंगल आहे.''. अनन्याचं हे उत्तर ऐकताच विजयने मान हलवून अतिशय थंड प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे एकूणच अनन्याच्या प्रपोजला विजयने सौम्य शब्दांत नकार दिला होता.


रश्मिकाच्या लग्नाच्या चर्चेदरम्यान व्हिडिओ व्हायरल

 विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना सध्या उदयपूरमध्ये विवाहबंधनात अडकत आहेत. अशा आनंदाच्या वातावरणात अनन्यासोबतचा या जुन्या व्हिडिओची चांगलीच चर्च आहे. अनन्या आणि विजय यांनी 'लायगर'मध्ये एकत्र काम केले होते आणि त्यावेळी त्यांच्या अफेअरच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र, विजयने नेहमीच अनन्याला एक चांगली मैत्रीण मानले आहे. त्यापलीकडे काही नाही. सध्या विजय आणि रश्मिकाच्या लग्नाच्या फोटो आणि व्हिडीओची चाहत्यांना आतुरता आहे.

Web Title : अनन्या पांडे का विजय देवरकोंडा को नेशनल टीवी पर प्रपोजल, विजय ने ठुकराया।

Web Summary : विजय देवरकोंडा और रश्मिका मंदाना की शादी की अफवाहों के बीच, अनन्या पांडे का 'कॉफी विद करण' पर विजय को प्रपोज करने का एक पुराना वीडियो फिर से सामने आया। अनन्या के सिंगल होने की बात कहने पर विजय ने उसे ठुकरा दिया, यह कहते हुए कि वह जानते थे कि वह तब रिलेशनशिप में थी।

Web Title : Ananya Pandey's proposal to Vijay Deverakonda on national TV rejected.

Web Summary : Amidst Vijay Deverakonda and Rashmika Mandanna's wedding rumors, an old video of Ananya Pandey proposing to Vijay on 'Koffee With Karan' resurfaced. Vijay turned down her proposal when Ananya confessed she was single, stating he knew she was in a relationship then.