रवी शास्त्रीच्या आकंठ प्रेमात बुडाली होती अमृता सिंग, पण 'या' एका कारणाने दिला लग्नाला नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 10:51 AM2024-05-27T10:51:06+5:302024-05-27T10:53:49+5:30

रवी शास्त्री-अमृता सिंग यांची प्रेमकहाणी गाजली. पण रवी यांनी ठेवलेल्या एका अटीमुळे अमृता यांनी लग्नाला नकार दिला. काय घडलं नेमकं? (ravi shastri, amrita singh)

actress Amrita Singh Ravi Shastri love story behind breakup marriage | रवी शास्त्रीच्या आकंठ प्रेमात बुडाली होती अमृता सिंग, पण 'या' एका कारणाने दिला लग्नाला नकार

रवी शास्त्रीच्या आकंठ प्रेमात बुडाली होती अमृता सिंग, पण 'या' एका कारणाने दिला लग्नाला नकार

विराट कोहली - अनुष्का शर्मा, झहीर खान - सागरिका घाटगे अशा क्रिकेटपटू आणि अभिनेत्रींच्या जोड्या चर्चेत असतात. अनेकदा अभिनेत्री क्रिकेटपटू पतीला सपोर्ट करण्यासाठी स्टेडिअमवर सुद्धा हजर असतात. अशातच आज आम्ही तुम्हाला अशाच एका जोडीचा किस्सा सांगणार आहोत. ही जोडी म्हणजे अभिनेत्री अमृता सिंग आणि क्रिकेटपटू रवी शास्त्री. एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडालेले रवी आणि अमृता यांचं प्रेमप्रकरण पुढे लग्नापर्यंत का पोहोचलं नाही? जाणून घ्या. 

अशी झाली होती अमृता-रवीची पहिली भेट

रवि शास्त्री आणि अमृता सिंग यांची पहिली भेट दोघांच्या एका कॉमन मित्राद्वारे झाली होती. रवी-अमृता यांची मैत्री पुढे वाढत गेली. आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघंही एकमेकांना डेट करत होते. एकमेकांच्या आकंठ प्रेमात होते. अगदी लग्नापर्यंत हे प्रेमप्रकरण येऊन पोहोचलं होतं. परंतु त्यांच्या प्रेमाची कहाणी अधुरीच राहिली. काय झालं होतं नेमकं? रवी - अमृता यांची प्रेमकहाणी यशस्वी का नाही झाली?

रवीची एक अट आणि अमृताचा लग्नाला नकार

एकमेकांना डेट केल्यावर रवी - अमृता लग्न करण्याच्या तयारीत होते. परंतु लग्नाआधी रवीने अमृताला सांगितलं की,  'लग्नानंतर तू सिनेमात काम करणार नाहीस'. अमृताला ही अट मान्य नव्हती. या दोघांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु गुंता सुटला नाहीच. शेवटी करिअरला प्राधान्य देऊन अमृताने लग्नाला नकार दिला. यामुळे रवी - अमृताची प्रेमकहाणी अधुरीच राहिली. सध्या सोशल मीडियावर दोघांनी एका मॅगझिनसाठी केलेलं फोटोशूट व्हायरल होतं.

Web Title: actress Amrita Singh Ravi Shastri love story behind breakup marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.