अर्ध्यावर शिक्षण सोडलेली अभिनेत्री आहे कोटयावधींची मालकीण; जाणून घ्या, 'द केरळ स्टोरी'फेम अदाचं नेटवर्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 15:05 IST2023-05-05T15:03:26+5:302023-05-05T15:05:04+5:30

Adah sharma: अदाने तिच्या करिअरमध्ये फार मोजक्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. मात्र, या कमी कारकिर्दीमध्येही तिने अमाप संपत्ती जमवली आहे.

actress adah sharma education qualification networth | अर्ध्यावर शिक्षण सोडलेली अभिनेत्री आहे कोटयावधींची मालकीण; जाणून घ्या, 'द केरळ स्टोरी'फेम अदाचं नेटवर्थ

अर्ध्यावर शिक्षण सोडलेली अभिनेत्री आहे कोटयावधींची मालकीण; जाणून घ्या, 'द केरळ स्टोरी'फेम अदाचं नेटवर्थ

सुदीप्तो सेन यांचा 'द केरळ स्टोरी' या सिनेमाची प्रदर्शनापूर्वीच सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. हा सिनेमा लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा दावा करत अनेकांनी त्याच्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती. या सिनेमात अभिनेत्री  अदा शर्मा मुख्य भूमिका साकारत असून सध्या सोशल मीडियावर तिची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे केवळ ३१ वर्षीय असलेल्या ही अभिनेत्री आज कोटयावधींची मालकीन आहे. त्यामुळे तिचं नेटवर्थ किती ते पाहुयात.
 २००८ साली विक्रम भट्ट यांच्या 1920 या हॉरर सिनेमातून अदाने कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर ती काही मोजक्या सिनेमांमध्ये झळकली मात्र, नेटकऱ्यांमध्ये बऱ्याचदा तिच्या ग्लॅमरस फोटो आणि फिटनेस व्हिडीओची चर्चा रंगली. सध्या अदा, द केरळ स्टोरी या सिनेमामुळे चर्चेत येत आहे. या सिनेमात तिने मुख्य भूमिका साकारली आहे.

द केरळ स्टोरी: लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारा सिनेमा? तिखट शब्दांत निर्मात्यांनी दिलं स्पष्टीकरण

अदाने तिच्या करिअरमध्ये फार मोजक्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. मात्र, या कमी कारकिर्दीमध्येही तिने अमाप संपत्ती जमवली आहे. विशेष म्हणजे अदाने अर्ध्यावर तिचं शिक्षण सोडत फिल्मी करिअरची वाट धरली. 

किती शिकली अदा अन् किती आहे तिचं नेटवर्थ

हिंदी सह अदाने तेलुगू आणि तामिळ सिनेमांमध्येही काम केलं आहे. त्यामुळे साऊथमध्येही तिची क्रेझ आहे.  अदाने केवळ १२ वी पर्यंत तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर ती अभिनय क्षेत्रात आली. अदा १० वीत असतानाच तिने अभिनेत्री होण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार, तिने या क्षेत्रात पदार्पणही केलं. काही संकेतस्थळांच्या माहितीनुसार, अदाचं एकूण नेटवर्थ ३ ते ५ मिलिअन आहे. तसंच ती महिन्याला ६० लाख रुपये कमावते.
 

Web Title: actress adah sharma education qualification networth