कुणी तरी येणार गं! विक्रांत मेस्सी आणि शीतलने अनोख्या पद्धतीने शेअर केली गोड बातमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 18:20 IST2023-09-24T18:19:48+5:302023-09-24T18:20:29+5:30
अभिनेता विक्रांत मेस्सी आणि शीतल ठाकूर लवकरच आई-बाबा होणार आहेत.

Vikrant Massey And Sheetal Thakur
बी-टाऊनसाठी हे वर्ष खूप खास आहे. काही स्टार्स लग्न बंधनात अडकत आहेत. तर काही पालक बनले आहेत तर काही होणार आहेत. आता बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी आणि शीतल ठाकूर यांनी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी शेअर केली. विक्रांत आणि शीतल लवकरच आई-बाबा होणार आहेत.
विक्रांत आणि शीतल यांच्या आयुष्यात लवकरच एक नवा चिमुकला पाहूणा येणार आहे. विक्रांतने सुंदर फोटो शेअर केला आहे. सोबतच फोटोला अभिनेत्याने ‘नवीन सुरुवात, बाळ २०२४ मध्ये येणार’ या आशयाचं कॅप्शन दिलं. सध्या त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून दोघांवरही चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विक्रांत आणि शीतल यांनी जवळपास सात वर्षे एकमेकांना डेट केले होते. यानंतर दोघांनी 2019 मध्ये साखरपुडा केला. तर फेब्रुवारी 2022 मध्ये लग्न केले. दोघांची भेट 'ब्रोकन बट ब्यूटीफुल' या वेब शोच्या सेटवर झाली होती. विक्रांतने एका मुलाखतीत शीतलचे भरभरुन कौतुक केले होते. विक्रांत आणि शीतल कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. सोशल मीडियावर देखील त्यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.
विक्रांतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, विक्रांत नुकताच 'मेड इन हेवन'मध्ये दिसला होता. तर लवकरच 'यार जिगरी', 'सेक्टर ३६', '१२ वी फेल' मध्ये आणि त्यानंतर 'आई हसीन दिलरुबा'मध्ये चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. शीतल ठाकुर हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, शीतल हिने ‘अपस्टार्ट्स’, ‘ब्रिज मोहन अमर रहे’ आणि ‘छप्पर फाड के’ सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल’ सिनेमात शीतल आणि विक्रांत यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली. ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल’ सिनेमा २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता.