फोटो दिसणार या लहान मुलांने बॉलिवूडमध्ये रचला होता नवा इतिहास, आज आहे महागडा अभिनेता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 17:24 IST2020-03-27T17:10:00+5:302020-03-27T17:24:24+5:30
इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक लहानपणीचा फोटो शेअर केला आहे.

फोटो दिसणार या लहान मुलांने बॉलिवूडमध्ये रचला होता नवा इतिहास, आज आहे महागडा अभिनेता
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 21 दिवसांसाठी पूर्णपणे लॉकडाउन केले आहे. यामुळे सेलिब्रेटींनी स्वत: ला क्वारांटाईन करुन घेतले आहे. अभिनेता विक्की कौशलने देखील स्वत:ला क्वारांटाईन दिले आहे. विकी कौशल सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्ह असतो. तो त्याच्या सोशल मीडियावर नेहमीच त्याचे फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असतो. विक्कीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याच्यासोबत त्याचा लहान भाऊ सनीसुद्धा दिसतोय. क्वारांटाईन बॉईज असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहेत. या फोटोमध्ये दोघे ही भाऊ खूपच क्युट दिसतायेत.
उरी फेम अभिनेता विकी कौशलने 'मसान' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या. त्याच्या सगळ्याच चित्रपटातील भूमिकांनी रसिकांच्या मनावर छाप उमटवली आहे.
रमण राघव', 'मनमर्जिया', 'संजू', 'राझी' आणि 'उरीः द सर्जिकल स्ट्राईक' या सगळ्याच भूमिकांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. त्याचे चित्रपट तिकिटबारीवर देखील यशस्वी ठरले आहेत. या सिनेमाने बॉलिवूडमध्ये इतिहास रचला आहे. विकी कौशलने बॉलिवूडमध्ये आज आपले प्रस्थ निर्माण केले आहे.
पण विकीसाठी इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्याचे वडील शाम कौशल हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध ॲक्शन डायरेक्टर असले तरी विकीने त्याच्या स्वतःच्या मेहनतीवर बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे.