२०० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये भूमिका, ६९ वर्षीय विनोदी अभिनेत्याला आता काम मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 10:30 IST2023-10-13T10:28:22+5:302023-10-13T10:30:59+5:30

गेल्या अनेक वर्षांपासून ते चित्रपट, मालिकांमध्ये विनोदी भूमिका साकारत आहेत. मात्र आज त्यांना काम मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

actor Tiku Talsania working in film industry since 39 years now he is jobless and asking for work | २०० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये भूमिका, ६९ वर्षीय विनोदी अभिनेत्याला आता काम मिळेना

२०० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये भूमिका, ६९ वर्षीय विनोदी अभिनेत्याला आता काम मिळेना

हिंदी मनोरंजनसृष्टीतील अभिनेते टीकू तल्सानिया (Tiku Talsania) यांची एक वेगळी ओळख आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते चित्रपट, मालिकांमध्ये विनोदी भूमिका साकारत आहेत. 'अंदाज अपना अपना', 'कुली नंबर १' सारख्या सिनेमांमधून त्यांनी आपला विनोदी अंदाज दाखवला आहे. मात्र आज त्यांना काम मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. २०० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये भूमिका करणारे अभिनेते आज जॉबलेस आहेत.

टीकू तल्सानिया नुकतंच एका मुलाखतीत म्हणाले, 'इंडस्ट्री जितकी तेजीत पुढे जात आहे मी सुद्धा त्यात सामावण्याचा प्रयत्न करत आहे. नवीन गोष्टी स्वीकारत आहे. पण आज मी थोडा जॉबलेस आहे. चांगल्या भूमिकांसाठी ऑडिशन देत आहे. पण मला तशा भूमिका मिळत नाहीएत. मी गुजराती आहे. अनेक वर्षांपासून गुजराती थिएटरमध्ये सक्रिय आहे. मी माझ्या करिअरची सुरुवातच गुजराती थिएटरपासून केली. आज जेव्हा माझ्याकडे कोणतंही काम येतं तर मी नकार देऊ शकत नाही. त्यासोबतच पुढे जाण्याचा विचार करतो. गेल्या काही वर्षांपासून मला काम मिळत नाहीए.'

ते पुढे म्हणाले, 'मी फिल्म किंवा टीव्हीपासून दूर झालेलो नाही. बस मी आता एका भूमिकेच्या शोधात आहे ज्यात मी फिट होऊ शकेन. जी भूमिका माझ्यासाठी योग्य असेल. मला काम करायला आवडतं. मी काही निवृत्ती घेतलेली नाही. पण काम तर मिळालं पाहिजे न. माझ्यासाठी कोणताच रोल नाहीए का. असंच सुरु राहिलं तर मी कसा सर्व्हाईव्ह करु.'

'माझी टीम मला अनेक स्क्रीप्ट्स आणून देते. मी काही ऑडिशनही दिल्या आहेत. पण इंडस्ट्रीत आता खूपच बदल झाला आहे. वेळ बदलली आहे. मला शांत राहणं गरजेचं आहे. कोरोनानंतर तर सगळंच डिस्टर्ब झालंय.  मला कामासाठी फोन येईल याची मी वाट पाहतोय. मी सुद्धा लोकांना कामासाठी अप्रोच करत आहे. चांगली भूमिका असेल तर मी हातून जाऊ देणार नाही.'

टिकू तल्सानिया गेल्या ४० वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहे. त्यांनी अनेक भूमिका केल्या आहेत. 'दिल है की मानता नही', 'अंदाज अपना अपना', 'इश्क' अशा अनेक सिनेमात काम केले आहे. 

Web Title: actor Tiku Talsania working in film industry since 39 years now he is jobless and asking for work