'या' ५८ वर्षीय अभिनेत्याची पत्नी आहे २६ वर्षांनी लहान, ५ वर्षांपूर्वी थाटला होता संसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 12:37 IST2023-12-03T12:35:19+5:302023-12-03T12:37:19+5:30
या ५८ वर्षीय अभिनेत्याचं पहिलं लग्न मोडल्यानंतर अनेक अभिनेत्रींबरोबर त्याच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.

'या' ५८ वर्षीय अभिनेत्याची पत्नी आहे २६ वर्षांनी लहान, ५ वर्षांपूर्वी थाटला होता संसार
मनोरंजनविश्वात लग्न, घटस्फोट ही फारच सामान्य बाब आहे. कधी कोणाचं जुळेल आणि कधी कोणाचा घटस्फोट होईल सांगता येत नाही. ५८ वर्षीय एका अभिनेत्याचं पहिलं लग्न मोडल्यानंतर तो चर्चेच्या केंद्रस्थानी आला होता. एकेकाळी आपल्या फिटनेसने तरुणींना वेड लावणाऱ्या अभिनेत्याने चाहत्यांच्या मनात आपले स्थान अढळ केले होते. या वयातही त्याची क्रेझ कायम आहे.
सोशल मीडीयावर चर्चेचा विषय ठरलेला हा अभिनेता म्हणजे मिलिंद सोमण.
अनेक तरुणींसोबत मिलिंद सोमणचे नाव जोडण्यात आले. माहितीनुसार, सुरूवातीला मिलिंद सोमण यांचे मिस युनिवर्स सेकंड रनर- अपमधु सप्रे हिच्यासोबत नाव जोडले गेले. काही काळ हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. पण यांचे नाते फार काळ टिकु शकले नाही. अखेर १९९५ त्यांनी त्यांनी ब्रेकअप केल्याचे सांगण्यात येते.
पहिले लग्न फार काळ टिकले नाही:
त्यानंतर व्हॅली ऑफ फ्लोवरच्या सेटवर मिलिंद सोमणची ओळख मायलीन जंपनोई हिच्यासोबत झाली काही वर्ष हे दोघे एकमेकांना डेट करत होते. २००६ मध्ये ते लग्नबंधनात अडकले. पण आप-आपसातील वादामुळे या नात्याला पूर्णविराम द्यायचे दोघांनी ठरवले. आणि शेवटी २००९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
दुसरे लग्न चर्चेचा विषय ठरला :
यानंतर २०१८ साली मिलिंद सोमणने २६ वर्षीय लहान अंकिता कोनवारसोबत. यामुळे तो पुन्हा एकदाप्रकाशझोतात आला. त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आले. मात्र याकडे लक्ष न देता मिलिंद आणि अंकिता यांच्यातील प्रेम दिवसेंदिवस वाढतच गेलं. आज दोघंही सुखाचा संसार करत आहेत. अंकिता आणि मिलिंद हे दोघे सोशल मीडीयावर नेहमी सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी हे दोघे त्यांचे फोटो, व्हिडीओज सोशल मीडीयावर अपलोड करतात.