'गँग्स ऑफ वासेपूर' की 'फॅमिली मॅन'...पाहा IMDb रेटिंगमध्ये कोणाची बाजी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 14:17 IST2023-04-23T13:38:41+5:302023-04-23T14:17:19+5:30
आज मनोज वाजपेयी 54 वा वाढदिवस साजरा करत आहे.

'गँग्स ऑफ वासेपूर' की 'फॅमिली मॅन'...पाहा IMDb रेटिंगमध्ये कोणाची बाजी?
Manoj Bajpayee : अभिनयाची आवड असलेल्या अनेकांचं फिल्म इंडस्ट्रीत येण्याचं स्वप्न असतं. मग अगदी छोट्या गावातून मुंबईत येत स्ट्रगल करण्याची त्यांची तयारी असते. असाच अंगात अभिनयाचा किडा असलेला अभिनेता म्हणजे मनोज वाजपेयी. आज मनोज वाजपेयी 54 वा वाढदिवस साजरा करत आहे. मनोजने त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक हिट सिनेमे दिले आहेत. तसेच तो फक्त चित्रपट नाही तर ओटीटी माध्यमही गाजवतोय.
मनोज बाजपेयीने आपल्या तीन दशकांच्या करिअरमध्ये विविध भाषांमध्ये सर्वोत्तम अभिनयाद्वारे भारतीय चित्रपटांमध्ये आपला असाधारण ठसा उमटवला आहे. पद्मश्री पुरस्कार विजेता हा कलाकार सर्वांत अलीकडे चित्रपट गुलमोहरमध्ये दिसला होता. दर्शक आणि समिक्षकांनी त्याची तितकीच स्तुती केली होती. त्याच्या काही उल्लेखनीय कलाकृतींमध्ये सत्या, स्पेशल 26, अलीगढ़ आणि द फॅमिली मॅनचा. समावेश होतो. पुढील काळात बाजपेयी बंदामध्ये अजय सोनी आणि कौस्तव सिन्हासोबत दिसणार आहे.
मनोज वाजपेयीला सर्वात जास्त गँग्स ऑफ वासेपूर सिनेमामुळे ओळखलं जातं. पण अलिकडच्या काळात त्याची 'फॅमिली मॅन' म्हणून जास्त ओळख आहे. होय, मनोजच्या गँग्स ऑफ वासेपूरपेक्षा जास्त 'फॅमिली मॅन' या वेब सिरीज ला सर्वात जास्त IMDb रेटिंग्स आहेत. या सिरीजला आयएमडीबीने (IMDb) ने 8.7 इतके रेटिंग दिले आहे. त्याखालोखाल सत्या, गँग्स ऑफ वासेपूर, 1971 या सिनेमांचा नंबर येतो.