८० वर्षीय अभिनेत्याने २९ वर्ष लहान पत्नीसोबत साजरा केला लग्नाचा १० वा वाढदिवस, ओळखलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 13:24 IST2026-01-19T13:23:54+5:302026-01-19T13:24:20+5:30

त्यांची चौथी पत्नी त्यांच्या सर्वात मोठ्या मुलीपेक्षाही लहान आहे.

actor kabir bedi at the age of 80 celebrated 10th wedding anniversary with 29 years younger wife parveen dusanj | ८० वर्षीय अभिनेत्याने २९ वर्ष लहान पत्नीसोबत साजरा केला लग्नाचा १० वा वाढदिवस, ओळखलंत का?

८० वर्षीय अभिनेत्याने २९ वर्ष लहान पत्नीसोबत साजरा केला लग्नाचा १० वा वाढदिवस, ओळखलंत का?

मनोरंजनविश्वात अशी अनेक जोडपी आहेत ज्यांच्या वयात कमालीचं अंतर आहे. ९-१० वर्षांचं अंतर तर आजकाल सामान्य आहे. मात्र एक असे अभिनेते आहेत ज्यांनी वयाच्या ७० व्या वर्षी ३० वर्षा छोट्या मुलीसोबत संसार थाटला. आज त्यांच्या लग्नाला १० वर्ष पूर्ण झाली आहे. याचा अर्थ सध्या अभिनेते ८० वर्षांचे असून त्यांनी आपल्या ५० वर्षांच्या पत्नीसोबत लग्नाचा १० वा वाढदिवस साजरा केला. कोण आहे हे अभिनेते?

हे आहेत अभिनेते कबीर बेदी. त्यांनी काल रविवारी पत्नी परवीन दुसांजसोबत लग्नाचा १० वा वाढदिवस साजरा केला. गोव्यातील समुद्रकिनारी जोडप्याने वेळ घालवला. लग्नाच्या वाढदिवसाचे फोटोही त्यांनी शेअर केले आहेत. ज्यात दोघंही गोव्यात एन्जॉय करत आहेत. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत त्यांनी लिहिले, "समुद्रकिनारी सूर्योदयाच्या साक्षीने हिरवी उंच झाडं आणि समुद्राच्या लाटा बघत आम्ही लग्नाची १० वर्ष आणि २० वर्षांच्या आमच्या नात्याचं सेलीब्रेशन केलं. सोबतच मी माझा ८० वा वाढदिवसही साजरा केला. एकत्र घालवलेला वेळ असो किंवा एकट्यातला वेळ असो, हे कायम आठवणीत राहणारं, प्रतिबिंबीत होणारं, सतत नव्याने उमगणारा रमणीय असा वेळ आहे. आम्ही परत आलो आहोत!"


कबीर बेदी या वयातही एकदम फिट दिसत आहेत. बायकोसोबतचे अनेक फोटो त्यांनी शेअर केले आहेत. सूर्यास्तावेळी समुद्रकिनारी बायकोचा हात हातात घेऊन ते उभे आहेत. आणखी एका फोटोत त्यांची पत्नी सेल्फी घएत आहे तर कबीर मागून कॅमेऱ्यात पाहून हसत आहेत. दोघंही सुट्ट्यांचा पुरेपूर आनंद घेत आहेत.

कबीर बेदी यांनी २०१६ साली परवीन दुसांजसोबत लग्न केलं. त्यांच्यात २९ वर्षांचं अंतर आहे. कबीर बेदी यांची पहिली मुलगी अभिनेत्री पूजा बेदीहून त्यांची पत्नी लहान आहे. या कारणामुळे त्यांना खूप ट्रोल करण्यात आलं होतं. पूजानेही वडिलांच्या या लग्नावरुन नाराजी व्यक्त केली होती. यापूर्वी १९६९ साली कबी बेदींचं प्रोमिताशी पहिलं लग्न झालं होतं. १९७४ साली त्यांचा घटस्फोट झाला. १९८० साली त्यांनी सुझॅन हम्फ्रीसोबत दुसरं लग्न केलं. १९९० साली ते वेगळे झाले. नंतर १९९२ साली त्यांनी निक्की बेदीसोबत लग्नगाठ बांधली. मात्र २००५ साली तिच्यासोबतही घटस्फोट झाला. २००६ साली ते २९ वर्ष लहा परवीन दुसांजच्या प्रेमात पडले. २०१६ साली त्यांनी लग्न केलं.

Web Title : कबीर बेदी ने 29 साल छोटी पत्नी के साथ मनाई 10वीं सालगिरह

Web Summary : अभिनेता कबीर बेदी ने अपनी पत्नी परवीन दुसांज के साथ गोवा में अपनी 10वीं शादी की सालगिरह मनाई। 29 साल के अंतर वाले इस जोड़े ने समुद्र के किनारे जश्न मनाया और सोशल मीडिया पर तस्वीरें साझा कीं। बेदी, अब 80, ने 2016 में दुसांज से शादी की।

Web Title : Kabir Bedi Celebrates 10th Anniversary with Wife, 29 Years Younger.

Web Summary : Actor Kabir Bedi celebrated his 10th wedding anniversary with Parveen Dusanj in Goa. The couple, with a 29-year age gap, marked the occasion with beachside celebrations and shared photos on social media. Bedi, now 80, married Dusanj in 2016.