"माझ्या हातात असतं तर.."; 'लव्हयापा' सिनेमा काही दिवसांत रिलीज होत असताना जुनैदच्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 18:24 IST2025-01-30T18:23:13+5:302025-01-30T18:24:46+5:30
'लव्हयापा' सिनेमा काहीच दिवसांमध्ये रिलीज होणार आहे. त्याआधी जुनैद खानने केलेलं वक्तव्य चर्चेत आहे

"माझ्या हातात असतं तर.."; 'लव्हयापा' सिनेमा काही दिवसांत रिलीज होत असताना जुनैदच्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या
'लव्हयापा' सिनेमाची सध्या तरुणाईमध्ये चांगलीच क्रेझ आहे. या सिनेमातून आमिर खानचा लेक जुनैद खान रुपेरी पडद्यावर पदार्पण करतोय. जुनैदसोबत श्रीदेवीची मुलगी खुशी कपूरही बिग स्क्रीनवर पदार्पण करतेय. दोघांनी याआधी ओटीटीवरील एका सिनेमात काम केलं होतं. जुनैद खानने प्रमोशनदरम्यान त्याच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या. अशातच 'लव्हयापा'च्या निमित्ताने एका मुलाखतीत जुनैदने केलेल्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
जुनैद खान असं काय म्हणाला?
जुनैदने एका मुलाखतीत आगामी 'लव्हयापा' सिनेमाबद्दल वक्तव्य केलं की, "माझ्या हातात अधिकार असते तर लव्हयापा सिनेमा मी फ्रीमध्ये यूट्युबवर रिलीज केला असता. परंतु मला जाणीव आहे की ही प्रॅक्टिकल कल्पना नाही. कारण कोणत्याही सिनेमाचं योग्य पद्धतीने वितरण करणं गरजेचं असतं." याशिवाय 'लव्हयापा' सिनेमा तामिळ सिनेमाचा रीमेक आहे या चर्चांवरही जुनैदने भाष्य केलं.
जुनैद म्हणाला की, "हा सिनेमा रीमेक असला तरीही सिनेमाचा फ्रेशनेस यामुळे कमी होत नाही. लव्हस्टोरी सिनेमे प्रत्येक वेळी लोकांसमोर आणण्याची वेगळी पद्धत आहे. याशिवाय आमच्या सिनेमाचं स्क्रीप्ट खूप मजेशीर आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा एक शानदार अनुभव होता." अशा शब्दात जुनैदने त्याचं म्हणणं मांडलंय. 'लव्हयापा' सिनेमा ७ फेब्रुवारी २०२५ ला रिलीज होणार असून सर्वांना सिनेमाची उत्सुकता आहे.