या रोमँटीक कपलचे नाते आले संपुष्टात, तडकाफडकी घटस्फोट देऊन झाले वेगळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 15:17 IST2020-04-24T15:16:42+5:302020-04-24T15:17:18+5:30
कॅलिरोई ग्रीसमधील असून एक अभिनेत्री आहे. तर गुलशनने 'शैतान', 'हेट स्टोरी', 'हंटर', 'मर्द को दर्द नहीं होता' यासारख्या चित्रपटात काम केले आहे.

या रोमँटीक कपलचे नाते आले संपुष्टात, तडकाफडकी घटस्फोट देऊन झाले वेगळे
रेशीमगाठी स्वर्गातच जुळतात असं म्हटलं जातं. लग्नबंधनात अडकलेले दाम्पत्य हाच जन्म नाही तर सात जन्म एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतात. मात्र चंदेरी दुनियेतील काही सेलिब्रिटी याला अपवाद ठरतात. अनेक कलाकारांची लग्न फार काळ टिकली नसल्याची उदाहरणं आहेत. काही ना काही खटके उडाल्यानंतर ही सेलिब्रिटी मंडळी आपल्या जोडीदारापासून वेगळे झाले आहेत. अशाच लग्न फार काळ न टिकलेल्या सेलिब्रिटींमध्ये आणखी एका अभिनेत्याचे नाव जोडलं गेलं आहे.
अभिनेता गुलशन देवैयाने पत्नी कॅलिरोई तजीएफ्टासोबत घटस्फोट घेतला आहे. त्यांचे 8 वर्षांचे वैवाहिक जीवन आता संपुष्टात आले आहे. हे पाऊल अत्यंत विचारपूर्वक घेतले गेले असल्याचे गुलशनने म्हटले आहे. गुलशननला त्याच्या नात्याची कोणत्याही प्रकारची पब्लिसिटी नको होती. कारण सेलिब्रेटींचे आयुष्यात काय सुरू असते यात ब-याच जणांना इंटरेस्ट असतो. आणि मला अशा प्रकारे माझ्याविषयी चर्चा व्हावी हे नको होते. म्हणून कधीच मुलाखतींत याबाबत कोणत्याही प्रकारचा उल्लेख केला नाही. नातेवाईक आणि मित्रमंडळींना माहिती आहे इतके पुरेसे आहे.
गुलशन आणि कॅलिरोई यांनी दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 2012 मध्ये लग्न केले होते. कॅलिरोई ग्रीसमधील असून एक अभिनेत्री आहे. तर गुलशनने 'शैतान', 'हेट स्टोरी', 'हंटर', 'मर्द को दर्द नहीं होता' यासारख्या चित्रपटात काम केले आहे.