'रमैय्या वस्तावैय्या'चा हिरो बऱ्याच वर्षांनी दिसला, ओळखणंही कठीण; नेटकरी म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 17:30 IST2025-06-05T17:30:05+5:302025-06-05T17:30:34+5:30
"जीने लगा हूँ, पहले से जादा..." गाणं ऐकलं की हा अभिनेता आठवतो

'रमैय्या वस्तावैय्या'चा हिरो बऱ्याच वर्षांनी दिसला, ओळखणंही कठीण; नेटकरी म्हणाले...
२०१३ साली आलेला श्रुती हसनचा 'रमैय्या वस्तावैय्या' सिनेमा आठवतोय? या सिनेमात गिरीश कुमार (Girish Kumar) हा अभिनेता होता. त्याने आपल्या आपल्या सहज अभिनयाने सर्वांचं मन जिंकलं होतं. त्याची एनर्जी, कॉमेडी, डान्स सगळंच अफलातून होतं. बॉलिवूडला नवा स्टार मिळाला अशीच तेव्हा सर्वांनी प्रतिक्रिया दिली. मात्र नंतर गिरीश कुमार गायब झाला. त्याचे काही सिनेमे आपटले. आता इतक्या वर्षांनी तो पुन्हा दिसला आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
"जीने लगा हूँ, पहले से जादा..." गाणं ऐकलं की हा अभिनेता आठवतो. गिरीश कुमार नुकताच मुंबईत दिसला. व्हाईट टीशर्ट, जीन्स आणि खांद्यावर बॅग अशा त्याचा कॅज्युअल लूक दिसत आहे. आजही त्याचा क्लीन शेव्ह लूक आहे. पापाराझींनी त्याला कॅमेऱ्यात कैद केलं. त्याने हसतच पोज दिली आणि तो जिममध्ये गेला. त्याचं वजन काहीसं वाढलेलं पाहायला मिळालं. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
'भावाने एक हिट दिला आणि गायब झाला','क्युट दिसतोय','नवीन सिनेमा कधी येणार?','हँडसम दिसतोय त्याने कमबॅक केलं पाहिजे' अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. अनेकजण त्याची आठवण काढत असून त्याला पुन्हा सिनेमांमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
कोण आहे गिरीश कुमार?
गिरीश कुमार हा प्रसिद्ध निर्माते रमेश तौरानींचा पुतण्या कुमार तौरानींचा मुलगा आहे. रमेश तौरानींनीच त्याचा 'रमैय्या वस्तावैय्या' सिनेमाची निर्मिती केली होती.