Birthday Special : हटके आहे अतुल कुलकर्णीची लव्हस्टोरी, म्हणून होऊ दिले नाही स्वत:चे मुलबाळ !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 08:00 IST2019-09-10T08:00:00+5:302019-09-10T08:00:09+5:30
अतुल कुलकर्णी : मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेता अतुल कुलकर्णी याचा आज (10 सप्टेंबर) वाढदिवस.

Birthday Special : हटके आहे अतुल कुलकर्णीची लव्हस्टोरी, म्हणून होऊ दिले नाही स्वत:चे मुलबाळ !
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेता अतुल कुलकर्णी याचा आज (10 सप्टेंबर) वाढदिवस. हिंदी, मराठीसह तेलगू, कन्नड, मल्याळम, तामिळ अशा विविध भाषांमध्ये एकापेक्षा एक सरस चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अतुल एक उत्तम अभिनेता तर आहेच. शिवाय निर्माताही आहे. एवढेच नव्हे तर आता लेखक ही त्याची नवी ओळखही रूढ होऊ पाहते आहे. आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या आगामी चित्रपटाचे लेखन अतुलने केले आहे.
अतुलच्या लव्हस्टोरीबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...
कॉलेजच्या दिवसांपासून अतुलने नाटकांत काम करणे सुरु केले होते. पुढे नॅशनल स्कून ऑफ ड्रामामध्ये त्याने प्रवेश घेतला आणि इथेच गीतांजलीवर तो भाळला. गीतांजलीसोबत आधी मैत्री झाली आणि ही मैत्री प्रेमात कधी बदलली हे अतुललाही कळले नाही. 29 डिसेंबर 1996 रोजी अतुल व गीतांजली लग्नबंधनात अडकले. एका मुलाखतीत अतुल लग्नाबद्दल बोलला होता. मी प्रेमात पडलो आणि चक्क लग्न केले, हा माझ्या कुटुंबासाठीही आश्चर्याचा धक्का होता. खरे तर मी प्रेमात कसा पडलो, हे एक कोडेच आहे, असे त्याने सांगितले होते.
गीतांजली व अतुलची लव्हस्टोरी हटके म्हणता येईल. एका मुलाखतीत अतुलने ही हटके लव्हस्टोरी उलगडली होती. ‘मी आणि गीतांजली आम्ही दोघे दिल्लीत नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये एकत्र शित होतो. मी दुस-या वर्षाला होतो तर गीतांजली पहिल्या वर्षाला. म्हणजेच ती माझी ज्युनिअर होती. मराठी विद्यार्थ्यांचा आमचा एक ग्रूप होतो. आम्ही धम्माल मज्जा करायचो. गीतांजलीही या ग्रूपमध्ये होती. एकदा आम्ही इंडिया गेटवर फिरायला गेलो असता गीतांजलीने पुढाकार घेतला आणि मला लग्नासाठी प्रपोज केले. मी थोडा वेळ घेतला पण काहीच दिवसांत तिला होकार कळवला,’ असे त्यांनी सांगितले होते.
अतुलची पत्नी गीतांजली ही सुद्धा एक अभिनेत्री आहे. अतुल व गीतांजलीच्या लग्नाला 23 वर्षे झालीत. पण अद्याप त्यांना मूल नाही. याचे कारण म्हणजे, दोघांनीही अगदी ठरवून स्वत:चे मुलबाळ होऊ दिले नाही. या निर्णयामागचे कारणही खास आहे. ते म्हणजे, दोघांनाही पारंपरिक नवरा-बायको अशी चौकट मान्य नाही. अतुलने एका मुलाखतीत याबद्दल सांगितले होते. आम्ही दोघेही पती-पत्नीपेक्षा एकमेकांचे चांगले मित्र आहोत. आम्हा दोघांनाही पारंपरिक लग्न, नवरा-बायको ही चौकट मान्य नाही. आम्हा दोघांचे स्वतंत्र जग आहे आणि हेच आमच्यासाठी खूप आहे. याचमुळे आम्ही अगदी ठरवून स्वत:चे अपत्य होऊ दिले नाही, असे त्याने सांगितले होते.