आमिर खानच्या आईला हृदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2022 18:43 IST2022-10-30T18:43:05+5:302022-10-30T18:43:44+5:30
आमिर खानची आई झीनत यांना हार्ट अटॅक आला, तेव्हा त्या पाचगणीमधील त्यांच्या घरी होत्या.

आमिर खानच्या आईला हृदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
मुंबई: अभिनेता आमिर खानची आई झीनत यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्या पाचगणी येथील त्यांच्या घरी होत्या. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले. दिवाळीनिमित्त आमिर खानही पाचगणीच्या घरी असल्याची माहिती आहे. सध्या कुटुंबातील इतर सदस्य रुग्णालयात पोहोचले आहेत.
आमिर खान आणि त्याच्या कुटुंबीयांकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. ETimes च्या वृत्तानुसार, सूत्राने सांगितले की, आमिरच्या आईवर ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या आमिरच्या आईची प्रकृती स्थिर असून, त्या उपचाराला प्रतिसाद देत आहेत. आमिर आणि त्याच्या कुटुंबीयांने यावर अद्याप मौन बाळगले आहे. झीनत यांच्या प्रकृतीबाबत अफवा पसरवू नयेत, अशी खान कुटुंबीयांची इच्छा आहे.