अक्षयचे कौतुक झाले अन् कमेंट करणारा अभिषेक बच्चन ट्रोल झाला, सोशल मीडियावर नवा राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 12:24 IST2020-12-17T12:14:27+5:302020-12-17T12:24:46+5:30

अभिषेक बच्चन सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल होतो. ट्रोलर्सला ज्युनिअर बच्चनने दिलेल्या उत्तराच्याही हेडलाईन्स बनतात. सध्या अभिषेक ट्रोल होतोय. पण नेहमीपेक्षा वेगळ्या कारणाने.

abhishek bachchan trolled for reacting on a tweet related to akshay kumar | अक्षयचे कौतुक झाले अन् कमेंट करणारा अभिषेक बच्चन ट्रोल झाला, सोशल मीडियावर नवा राडा

अक्षयचे कौतुक झाले अन् कमेंट करणारा अभिषेक बच्चन ट्रोल झाला, सोशल मीडियावर नवा राडा

ठळक मुद्दे‘अभिषेक स्वत: नेपोटिजमचा प्रॉडक्ट आहे आणि आता अक्षय कुमारला जज करतोय,’ असे या युजरने लिहिले. अर्थात लगेच त्याने ही कमेंट डिलीटही केली. मात्र अभिषेकने यावरही उत्तर दिले.

अभिषेक बच्चन सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल होतो. विशेष म्हणजे, ट्रोलर्सला ज्युनिअर बच्चनने दिलेल्या उत्तराच्याही हेडलाईन्स बनतात. सध्या अभिषेक ट्रोल होतोय. पण नेहमीपेक्षा वेगळ्या कारणाने. होय, तर अलीकडे एका ड्रिस्टिब्यूटरने अक्षय कुमारचे कौतुक करत ट्वीट केले. अभिषेकने या ट्वीटवर कमेंट केली. पण त्याच्या या कमेंटचा लोकांनी चुकीचा अर्थ काढला. अभिषेकला अक्षयचे कौतुक सहन झाले नाही, असे लोकांना वाटले. मग काय, यावरून अनेकांनी अभिषेकला ट्रोल केले.

काय होती अभिषेकची कमेंट?
तर त्याचे झाले असे की, डिस्ट्रिब्युटर अक्षय राठीने एक ट्वीट केले. ‘हैराण करणारी गोष्ट आहे की, अक्षय कुमार जितक्या वेळात एक अख्खा सिनेमा पूर्ण करतो, बाकी कलाकारांना तितका वेळ एक लहानसा सीन करा करावा, हे शिकण्यासाठी लागतो. इतकेच नाही तर अक्षयचे सर्व सिनेमे हिट होता. माझ्यामते, बहुतांश कलाकारांना सर्वोत्तम नियोजन करण्याची गरज आहे,’ असे ट्वीट अक्षय राठीने केले.


यावर अभिषेकला राहावले नाही. त्याने लगेच अक्षय राठीच्या या ट्वीटवर कमेंट केली. ‘माझ्या मते, हे योग्य नाही. प्रत्येकजण वेगळा असतो. वेगवेगळ्या व्यक्तिला वेगवेगळ्या गोष्टींमधून प्रेरणा मिळते. प्रत्येकाची काम करण्याची स्पीड वेगळी असते,’ अशी प्रतिक्रिया अभिषेकने यावर दिली. पण त्याची ही कमेंट वाचून लोकांनी त्याला ट्रोल करणे सुरु केले.

तू स्लो आहेस म्हणून तुला वाईट वाटतेय....


एका युजरने यावरून अभिषेकला डिवचले. ‘भावा, कोणी चांगले काम करत असेन तर त्याचे कौतुक करायलाच हवे. मला माहितीये, तू स्लो आहेत, म्हणून तुला वाईट वाटले,’ अशा शब्दांत या युजरला ट्रोल केले. यावर अभिषेकने लगेच उत्तर दिेले. ‘महामारीच्या काळात मी एक वेबसीरिज, एक डॉक्युमेंट्री आणि 3 सिनेमे पूर्ण केले. प्रमोशनही केले. माझ्या स्पीडचा प्रॉब्लेस आहे, असे मला वाटत नाही.’ आणखी एका युजरनेही अभिषेकला ट्रोल केले.

‘अभिषेक स्वत: नेपोटिजमचा प्रॉडक्ट आहे आणि आता अक्षय कुमारला जज करतोय,’ असे या युजरने लिहिले. अर्थात लगेच त्याने ही कमेंट डिलीटही केली. मात्र अभिषेकने यावरही उत्तर दिले. ‘कोणी जज करत नाहीये भावा. अक्की भैय्याचे काम कौतुकास्पद आहे,’ असे अभिषेकने लिहिले.

अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या बॉडीगार्डची सॅलरीचा आकडा वाचून येईल तुम्हाला भोवळ

 

Web Title: abhishek bachchan trolled for reacting on a tweet related to akshay kumar