You will be amazed to read the salary figures of Akshay Kumar and Amitabh Bachchan's bodyguards | अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या बॉडीगार्डची सॅलरीचा आकडा वाचून येईल तुम्हाला भोवळ

अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या बॉडीगार्डची सॅलरीचा आकडा वाचून येईल तुम्हाला भोवळ

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन. त्यामुळेच त्यांना पाहण्यासाठी त्यांचे चाहते गर्दी करतात. त्यामुळे त्यांना बॉडीगार्डची नितांत गरज असते. हे कलाकार बॉडीगार्ड शिवाय कोणत्याच कार्यक्रमात एन्ट्री करत नाहीत. बॉलिवूडमध्ये जवळपास सर्वच कलाकारांचे स्वतःचे बॉडीगार्ड आहेत. बॉलिवूडचे कलाकारदेखील त्यांच्या बॉडीगार्डची तेवढीच काळजीदेखील घेतात. या बॉडीगार्डची सॅलरीदेखील चांगलीच असते. त्यांचे मानधन ऐकून तुम्ही चक्रावून जाल.
 

बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेते अमिताभ बच्चन गेल्या कित्येक काळापासून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहेत. असे सांगितले जाते की अमिताभ बच्चन घराच्या अंगणातदेखील बॉडीगार्डशिवाय निघत नाहीत. त्यांचे बॉडीगार्ड नेहमी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतात. मीडिया रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांच्या बॉडीगार्डचे नाव जितेंद्र शिंदे आहे. त्यांना अमिताभ बच्चन वर्षाला जवळपास दीड कोटी सॅलरी देतात.

तर बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय त्या सुपरस्टार्सपैकी एक आहे ज्याच्याकडे चित्रपटांची कमतरता नाही. अक्षय कुमार बॉलिवूडमधील कलाकारांमध्ये सर्वात जास्त कमाई करणारा कलाकार आहे. दरवर्षी त्याचे एक नाही तर पाच चित्रपट रिलीज होतात. मात्र २०२०मध्ये त्याचा फक्त एकच चित्रपट रिलीज झाला.

अक्षय कुमारदेखील कोणत्याही इव्हेंटमध्ये जातो तेव्हा सुरक्षारक्षकाशिवाय पाऊलच टाकत नाही. जेव्हा तो कधी आपल्या फॅमिलीसोबत बाहेर जातो तेव्हा त्याचे बॉडीगार्ड त्याच्या सुरक्षेच्याबाबतीत सतर्क असतात. अशात अक्षय कुमारदेखील त्यांची तितकीच काळजी घेतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार अक्षय कुमार वर्षाला १.२ कोटी सॅलरी आपल्या बॉडीगार्डना देतो.

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: You will be amazed to read the salary figures of Akshay Kumar and Amitabh Bachchan's bodyguards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.