"मी तुमच्यासोबत झोपू का?"; अभिषेक बच्चनने केलेली निरासग मागणी, अभिनेत्री म्हणाली- "तू आधी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 13:54 IST2025-10-05T13:53:16+5:302025-10-05T13:54:53+5:30
अभिषेक बच्चनने एका प्रसिद्ध अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी. तेव्हा अभिनेत्रीने ज्युनिअर बच्चनला दिलेलं उत्तर चर्चेत आहे

"मी तुमच्यासोबत झोपू का?"; अभिषेक बच्चनने केलेली निरासग मागणी, अभिनेत्री म्हणाली- "तू आधी..."
अभिषेक बच्चन हा बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता. अभिषेक बच्चनचं रिअल लाईफमध्ये ऐश्वर्या राय बच्चनसोबत लग्न झालं. अशातच अभिषेकसंबंधी एक किस्सा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये अभिषेकने एका ज्येष्ठ अभिनेत्रीकडे ''मी तुमच्यासोबत झोपू का?'' अशी मागणी केली होती. त्यावेळी विचित्र मागणी केल्याने अभिनेत्रीला चांगलाच धक्का बसला होता. पुढे काय घडलं?
अभिषेकने ज्येष्ठ अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
यारो की बारात या टीव्ही शोमध्ये अभिषेकने हा खास किस्सा सांगितला आहे. झालं असं होतं की, १९८३ साली 'महान' सिनेमाचं शूटिंग काठमांडू येथे सुरु होतं. अमिताभ बच्चन यांच्यासोबत वयाने लहान असलेला अभिषेक सुद्धा वडिलांसोबत गेला होता. त्यावेळी शूटिंग झाल्यावर सर्व रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले. नंतर सर्वजण हॉटेलमध्ये झोपण्यासाठी जायला लागले. त्यावेळी अभिनेत्री झीनत अमान तिथे होत्या.
अभिषेकच्या मनात झीनत अमानबद्दल खूप प्रेम होतं. लहानग्या अभिषेकचं पहिलं प्रेम झीनत होत्या, अशी कबुली त्याने दिली. त्यावेळी सर्व झोपायच्या तयारीत असताना लहानग्या अभिषेकने झीनत यांना विचारलं, ''झीनत आँटी तुम्ही कुठे जात आहात?'' तेव्हा झीनत यांनी, ''मी माझ्या खोलीत झोपायला जातेय.'' लहान वयात झोपताना कोणीतरी सोबत असतं, अशी अभिषेकला सवय होती. त्यामुळे त्याने त्या निरागस वयात झीनत यांना विचारलं, ''मी तुमच्यासोबत झोपू शकतो का?''
अभिषेकने हा प्रश्न विचारताच झीनत यांनी ही गोष्ट खेळकरपणे घेतली. त्या अभिषेकला म्हणाल्या - ''आधी थोडा मोठा हो. मग माझ्यासोबत तू झोपू शकतो.'', अशाप्रकारे अभिषेकने हा खास किस्सा सांगितला. अभिषेकने हा किस्सा सांगताच शोमध्ये उपस्थित असलेले संजय दत्त, अजय देवगन, रितेश देशमुख आणि साजिद खान सर्वजण हसायला लागले. अशाप्रकारे अभिषेकने त्याचं पहिलं प्रेम झीनत अमान असल्याचं सांगितलं.