वडिलांना घाबरुन एकामागून एक दिले १७ रीटेक; अभिषेक बच्चनने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 13:38 IST2023-08-28T12:51:37+5:302023-08-28T13:38:25+5:30
२००० मध्ये रिलीज झालेला 'रिफ्युजी' हा अभिषेक बच्चनचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात त्याने एक सीनसाठी १७ रिटेक दिले होते.

ABHISHEK
अभिषेक बच्चनचा बहुचर्चित घूमर सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या चित्रपटातील त्याच्या कामाचेही खूप कौतुक होत आहे. १२ ऑगस्ट रोजी मेलबर्नच्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर झाला. यावेळी बोलताने अभिषेकने आपण पहिल्या चित्रपटात १७ रिटेक दिल्याचे उघड केले.
२००० मध्ये रिलीज झालेला 'रिफ्युजी' हा अभिषेक बच्चनचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात त्याने एक सीनसाठी १७ रिटेक दिले होते. पहिल्या चित्रपटातील पहिलाच डायलॉग समजण्यात माझ्याकडून चूक झाली. त्याचा मनस्ताप संपुर्ण टीमला भोगावा लागल्याचे अभिषेक बच्चनने सांगितले. तो म्हणाला की, 'अज्ञान आणि अंहकारात हा सीन सहज करु शकते असे मला वाटले होते. पण तो केवळ एक डॉयलॉग नसून तीन पानांचा पूर्ण सीन आहे, हे कळाल्यावर मला धक्काच बसला. हे सर्व आपल्या वडिलांना कळणार यामुळे घाबरुन गेलो आणि एकामागून एक १७ टेक दिले'.
अभिषेकने सांगितले की, 'जेव्हा मी त्या सीनमध्ये १७ टेक दिले, तेव्हा अनुपम खेर, रीना रॉय सारखे दिग्गज कलाकार उपस्थित होते. या प्रकरणाचे गांभीर्य समजले तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यानंतर जेपी दत्ता यांनी संपूर्ण युनिटला सेट रिकामा करण्यास सांगितले. त्यांनी मला न घाबरता पूर्ण तयारी करण्याचा सल्ला दिला. जेपी दत्तांनी प्रोत्साहन दिल्याने मला थोडा धीर आला'.