कलाविश्वापासून दूर असूनही अभय देओल जगतोय लक्झरी लाइफ; जंगलाच्या मधोमध उभारलाय काचेचा महाल; पाहा video
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 17:03 IST2022-02-02T17:03:09+5:302022-02-02T17:03:35+5:30
Abhay deol: अभयच्या घरात अनेक सोयीसुविधा आहेत. यात एक मोठा स्विमिंग पूलदेखील आहे. हा पूल खास पद्धतीने डिझाइन करण्यात आला आला आहे.

कलाविश्वापासून दूर असूनही अभय देओल जगतोय लक्झरी लाइफ; जंगलाच्या मधोमध उभारलाय काचेचा महाल; पाहा video
बॉलिवूड अभिनेता अभय देओल (Abhay deol) सध्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. सोशल मीडियावर सक्रीय असलेला अभय अनेकदा त्याचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. परंतु, सद्या तो एका व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. अभयने गोव्यात एक आलिशान बंगला उभारला असून हा बंगला काचेचा असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच सध्या त्याच्या आलिशान घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
'Where The Heart Is Season' या युट्यूब शोमध्ये त्याने संपूर्ण घराची सफर केली असून या घराविषयी त्याच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. माझ्या घरात मला खिडक्या नकोय. त्याऐवजी मला मोठमोठे काचेचे दरवाजे हवेत तेही स्लायडिंगचे ज्यामुळे घरात गेल्यानंतर घरातून बाहेरचा निसर्ग छान दिसेल, असं अभयने आर्किटेक्टला सांगितलं होतं. आणि, त्यानुसारच त्याचं घर बांधण्यात आलं.
दरम्यान, अभयच्या घरात अनेक सोयीसुविधा आहेत. यात एक मोठा स्विमिंग पूलदेखील आहे. हा पूल खास पद्धतीने डिझाइन करण्यात आला आला आहे. तसंच घरात लाकूड आणि ग्रेनाइटपासून जमिनीचं फ्लोरिंग करण्यात आलं आहे.