Aaradhya Bachchan: आराध्या बच्चनच्या फेक न्यूज देणाऱ्यांना फटकारले, गुगल, यू-ट्युबला कडक ताकीद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 05:16 IST2023-04-21T05:15:48+5:302023-04-21T05:16:39+5:30
Aaradhya Bachchan: अमिताभ बच्चन यांची नात आणि ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन हिच्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली, त्यानंतर न्यायालयाने गुगल ते यू-ट्युबला ताकीद दिली

Aaradhya Bachchan: आराध्या बच्चनच्या फेक न्यूज देणाऱ्यांना फटकारले, गुगल, यू-ट्युबला कडक ताकीद
नवी दिल्ली : अमिताभ बच्चन यांची नात आणि ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन हिच्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली, त्यानंतर न्यायालयानेगुगल ते यू-ट्युबला ताकीद दिली असून, लेखी उत्तरे मागितली. पुढील सुनावणी ९ मे रोजी होणार आहे..
आराध्याने तिच्या आरोग्य आणि आयुष्याशी संबंधित खोट्या बातम्या दिल्याबद्दल यू-ट्युब चॅनेल्सविरोधात याचिका दाखल केली हाेती. तिच्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने संबंधित कोणतीही सामग्री सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित करण्यास बंदी घातली. न्यायमूर्ती सी. हरिशंकर यांच्या खंडपीठाने चॅनलला विचारले की, अशा प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी तुमच्याकडे धोरण का नाही? यू-ट्युब चॅनलच्या बाजूने हजर असलेल्या वकिलांना न्यायालयाने सांगितले की, तुम्ही फक्त माहिती पुरवत आहात आणि तुम्हाला त्याच्या सत्याशी काहीही देणे-घेणे नाही.
कोर्टाने म्हटले...
nहे चुकीची माहिती पसरविण्याचे प्रकरण आहे. यू-ट्युब नफा कमावणारे व्यासपीठ आहे. तुम्ही नफा मिळवत असाल तर तुमची सामाजिक जबाबदारीही आहे.
nयू-ट्युबच्या पॉलिसीमध्ये काहीतरी गडबड आहे. आराध्याची मॉर्फ छायाचित्रेही वापरली गेली आहेत. असे व्हिडीओ गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन करतात.
nसेलिब्रेटी आणि सामान्य मुलांना सन्मानाचा अधिकार आहे. मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याबाबत दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणे कायद्याने पूर्णपणे चुकीचे आहे.