दोन अनोळखी माणसांमध्ये फुललेली अनोखी प्रेमकथा; 'आँखो की गुस्ताखियां' सिनेमाचा टीझर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 14:50 IST2025-06-05T14:49:58+5:302025-06-05T14:50:40+5:30

'आँखो की गुस्ताखियां' या सिनेमाचा खास टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात शनाया कपूर आणि विक्रांत मेस्सी प्रमुख भूमिकेत आहेत

Aankhon Ki Gustaakhiyan teaser release starring Vikrant Massey Shanaya Kapoor | दोन अनोळखी माणसांमध्ये फुललेली अनोखी प्रेमकथा; 'आँखो की गुस्ताखियां' सिनेमाचा टीझर रिलीज

दोन अनोळखी माणसांमध्ये फुललेली अनोखी प्रेमकथा; 'आँखो की गुस्ताखियां' सिनेमाचा टीझर रिलीज

कालच 'आँखों की गुस्ताखियां' सिनेमाची घोषणा झाली. या सिनेमात विक्रांत मेस्सी आमि शनाया कपूर प्रमुख भूमिकेत आहेत. नुकतंच या सिनेमाच्या पहिल्या पोस्टरनंतर आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. प्रेम, भावना आणि रोमँटिक क्षणांनी हा टीझर भरलेला आहे. विक्रांत आणि शनायाच्या हा टीझर अल्पावधीत व्हायरल झाला आहे. '१२th फेल' हा सिनेमा गाजवल्यावर विक्रांत मेस्सी रोमँटिक भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

 'आंखों की गुस्ताखियां' सिनेमाचा टीझर

 'आँखों की गुस्ताखियां' सिनेमाच्या टीझरमध्ये दाखवले आहे की, दोन अनोळखी माणसं अचानक भेटतात आणि त्यांची प्रेमकहाणी सुरू होते. फारसं बोलणं न करता, इशाऱ्यांमधून आणि संगीतातून त्यांचं प्रेम फुलताना दिसतं, पण नंतर त्यांच्यातील दुरावा देखील दिसतो. या दोघांपैकी एकाच्या डोळ्यावर पट्टी दिसते. त्यामुळे विक्रांत आणि शनायाची लव्हस्टोरी अनोखी असणार, यात शंका नाही. 

 'आँखों की गुस्ताखियां' हा चित्रपट झी स्टुडिओज आणि मिनी फिल्म्स यांच्या प्रस्तुतीने बनवण्यात आला आहे. मानसी बागला आणि वरुण बागला यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, दिग्दर्शन संतोष सिंग यांनी केलं आहे. कथा स्वतः मानसी बागला यांनी लिहिली आहे. विशाल मिश्रा यांनी सिनेमाच्या संगीताची जबाबदारी सांभाळली आहे. विक्रांत आणि शनायासोबत आणखी कोणते कलाकार दिसणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. हा चित्रपट ११ जुलै २०२५ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Aankhon Ki Gustaakhiyan teaser release starring Vikrant Massey Shanaya Kapoor