१३ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत विक्रांत मेसीचा किसिंग सीन, व्हिडीओ चर्चेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 10:02 IST2025-06-06T09:53:13+5:302025-06-06T10:02:48+5:30

१३ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत विक्रांत मेसीचा किसिंग सीन!

Aankhon Ki Gustaakhiyan Teaser Out Vikrant Massey Shanaya Kapoor Kissing Scene | १३ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत विक्रांत मेसीचा किसिंग सीन, व्हिडीओ चर्चेत!

१३ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत विक्रांत मेसीचा किसिंग सीन, व्हिडीओ चर्चेत!

अभिनेता विक्रांत मेसी याचा नवा चित्रपट 'ऑंखो की गुस्ताखियाँ' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या सिनेमाचा दमदार टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. टीझरमध्ये दाखवण्यात आलेला किसिंग सीन चर्चेत आला आहे. विक्रांत मेसीनं आपल्या वयापेक्षा १३ वर्षांनी लहान असलेल्या स्टार किडसोबत किसिंग सीन दिला आहे. 

नुकतंच आँखों की गुस्ताखियाँ' या सिनेमाची पहिली झलक समोर आली आहे. या सिनेमातून संजय कपूर आणि महिप कपूर यांची २५ वर्षीय लेक शनाया कपूरबॉलिवूड पदार्पण करते आहे. या सिनेमात ३८ वर्षीय विक्रांतने शनायासोबत विविध रोमँटिक सीनही केले आहेत. त्यांच्यातील किसिंग सीनही टीजरमध्ये दाखवण्यात आलाय. शनाया आणि विक्रांत या दोघांमधील वयाचं अंतर पाहता अनेकांना हा सीन पटला नाही. पण, काहींनी याला 'स्क्रिप्टची गरज' म्हणून समजून घेतलंय. 


लहान अभिनेत्रींसोबत रोमान्स सीन दिल्यानं ट्रोल झाले अभिनेते 

गेल्या काही दिवसांमध्ये काही अभिनेत्यांना आपल्यापेक्षा लहान वयाच्या अभिनेत्रींसोबत रोमान्स सीन केल्यानं ट्रोल केलं आहे. मग बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खान असो की सुपरस्टार कमल हसन.  'सिकंदर'मध्ये सलमान खान त्याच्यापेक्षा लहान रश्मिका मंदानासोबत दिसला होता. त्यावरून त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं. त्यापाठोपाठ कमल हसन आणि त्रिशा कृष्णन यांचा रोमँटिक ट्रॅक ठग लाईफच्या ट्रेलरमध्ये दिसला.  कमल हसन हे सध्या ७० वर्षांचे आहेत तर त्रिशा कृष्णन ४२ वर्षांची आहे. त्यावरुन नेटकऱ्यांनी कमल हसन यांना ट्रोल केलं. हेच नाही तर  सैफ अली खानदेखील त्याच्यापेक्षा २० वर्षांनी लहान मुलीसोबत 'ज्वेल थीफ' सिनेमात रोमान्स करताना दिसला होता. 

Web Title: Aankhon Ki Gustaakhiyan Teaser Out Vikrant Massey Shanaya Kapoor Kissing Scene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.