आमिर खानच्या बहुचर्चित 'सितारे जमीन पर'चं पहिलं पोस्टर आऊट, 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 13:14 IST2025-05-05T13:13:52+5:302025-05-05T13:14:37+5:30
आमिर खान-जिनिलीया देशमुखची प्रमुख भूमिका असलेल्या 'सितारे जमीन पर' सिनेमाचं पहिलं ऑफिशिअल पोस्टर रिलीज झालं असून तारीखही समोर आली आहे (aamir khan)

आमिर खानच्या बहुचर्चित 'सितारे जमीन पर'चं पहिलं पोस्टर आऊट, 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा
२००७ साली सुपरहिट झालेला 'तारे जमीन पर' सिनेमा अनेकांना आजही आवडतो. याच सिनेमाचा स्पिरिच्युअल सीक्वल असलेल्या आगामी 'सितारे जमीन पर' सिनेमाची (sitaare zameen par) आज अधिकृत घोषणा झाली आहे. आमिर खानच्या (aamir khan) आगामी सिनेमाचं पहिलं पोस्टर आज चाहत्यांच्या भेटीला आलं आहे. विशेष म्हणजे या सिनेमात अभिनेत्री जिनिलीया देशमुख (genelia deshmukh) आमिर खानसोबत झळकणार आहे. काय आहे या सिनेमाची रिलीज डेट? जाणून घ्या.
'सितारे जमीन पर' या तारखेला होणार रिलीज
आज नुकतंच सोशल मीडियाच्या माध्यमातून 'सितारे जमीन पर' सिनेमाचं पहिलं अधिकृत पोस्टर आज रिलीज झालं आहे. या पोस्टरमध्ये आमिर खान स्टायलिश लूकमध्ये दिसत असून त्याच्यासोबत दिव्यांग मुलं पाहायला मिळत आहेत. या सिनेमात जिनिलीया देशमुख सुद्धा असणार आहे. परंतु तिच्या भूमिकेचा उलगडा अद्याप पोस्टरमधून झाला नाहीये. हा सिनेमा २० जूनला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 'तारे जमीन पर'प्रमाणे 'सितारे जमीन पर' सिनेमाही एका संवेदनशील विषयावरील सिनेमा असून प्रेक्षकांना हा सिनेमा भावुक करेल यात शंका नाही.
२० कलाकारांचं या सिनेमातून पदार्पण
'सितारे जमीन पर'च्या पोस्टरमध्ये आमिर खानसोबत १० नवीन चेहरे पाहायला मिळत आहेत. अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, सम्वित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषि शाहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर हे दहा कलाकार या सिनेमातून पदार्पण करणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन आर.एस. प्रसन्ना यांनी केलं आहे. आमिर खान प्रॉडक्शन, रवी भागचंदका यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. पोस्टरपासूनच हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.