"दोन घटस्फोटांनंतर आता मला पार्टनरची...", आमिर खानने गर्लफ्रेंड गौरीबद्दल केलं भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 13:01 IST2025-06-02T13:00:22+5:302025-06-02T13:01:22+5:30

पूर्व पत्नींबद्दलही बोलला आमिर खान

aamir khan talks about girlfriend gauri spratt says thought now i dont need anyone | "दोन घटस्फोटांनंतर आता मला पार्टनरची...", आमिर खानने गर्लफ्रेंड गौरीबद्दल केलं भाष्य

"दोन घटस्फोटांनंतर आता मला पार्टनरची...", आमिर खानने गर्लफ्रेंड गौरीबद्दल केलं भाष्य

'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान (Aamir Khan) आगामी 'सितारे जमीन पर' सिनेमातून भेटीला येणार आहे. २० जून रोजी सिनेमा रिलीज होणार आहे. 'लाल सिंग चड्डा' फ्लॉप झाल्यानंतर तो कोणत्याही सिनेमात दिसला नव्हता. आता तो थेट आता या सिनेमात दिसणार आहे. याशिवाय तो वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. वयाच्या ६० व्या वर्षी तो प्रेमात पडला असून ४६ वर्षीय गौरी स्प्रॅटला (Gauri Spratt) तो डेट करत आहे. दोन घटस्फोटांनंतर तो आता गौरीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. नुकतंच त्याने गौरीबद्दल भाष्य केलं आहे.

राज शमानीला दिलेल्या मुलाखतीत आमिर खानने अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी गौरीबद्दल तो म्हणाला, "गौरीला भेटण्याआधी मला वाटायचं की मी म्हातारा झालो आहे. या वयात आता मला कोण भेटणार? मात्र थेरेपीमुळे मी हे शिकलो की आधी मला स्वत:वर प्रेम करणं गरजेचं आहे. मला बरं व्हायचं होतं आणि स्वत:च्या तब्येतीकडे लक्ष द्यायचं होतं. तसंच रीना आणि किरणसोबत माझे चांगले संबंध राहिले आहेत. आजही आम्ही चांगले मित्र आहोत. आमच्या मनात एकमेकांबद्दल आदर आहे. मला असं वाटायचं की आता मला कोणीही अशी व्यक्ती भेटणार नाही जिच्यासोबत माझा इतका छान बॉन्ड होईल."

तो पुढे म्हणाला, "मी आणि गौरी चुकून एकमेकांना भेटलो. आमच्यात मैत्री झाली आणि आम्ही प्रेमात पडलो. एकमेकांबद्दल आदर वाढला. ते आपोआप झालं मी काही प्लॅन केलं नव्हतं. मी तर असा विचार केला होता की माझ्याजवळ आई आहे, भावंडं आहेत, माझी मुलं आहेत. आता मला पार्टनरची गरज नाही. कारण माझी बाकी नातीच इतकी घट्ट होती. किरण, रीनासोबत आजही मी पानी फाऊंडेशनसाठी काम करतो. आम्ही सगळे नेहमीच एक कुटुंब राहिलो आहोत. दोघीही माझ्या आयुष्याचा अतुट भाग आहेत. त्यामुळे आता माझ्या आयुष्यात कोणीही येणार नाही हेच मला वाटायचं. पण गौरीच्या रुपात मला सरप्राईजच मिळालं."

Web Title: aamir khan talks about girlfriend gauri spratt says thought now i dont need anyone