साई पल्लवीबरोबर रोमान्स करणार आमिरचा लेक जुनैद, शूटिंगदरम्यानचे फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 09:40 IST2024-02-13T09:38:43+5:302024-02-13T09:40:25+5:30
पहिल्या सिनेमाच्या प्रदर्शनाआधीच जुनैदने त्याच्या दुसऱ्या सिनेमाचं शूटिंगही सुरू केलं आहे. या सिनेमात तो दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.

साई पल्लवीबरोबर रोमान्स करणार आमिरचा लेक जुनैद, शूटिंगदरम्यानचे फोटो व्हायरल
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा लेकही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनयात करिअर करण्यास उत्सुक आहे. आमिरचा लेक जुनैद खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 'महाराज' या सिनेमातून जुनैद बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणार आहे. २०२४मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. पहिल्या सिनेमाच्या प्रदर्शनाआधीच जुनैदने त्याच्या दुसऱ्या सिनेमाचं शूटिंगही सुरू केलं आहे.
जुनैदच्या या सिनेमाच्या सेटवरील काही फोटो समोर आले आहेत. या सिनेमात तो दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. या सिनेमाची निर्मिती आमिर खान प्रोडक्शनमधून करण्यात येत आहे. सध्या या सिनेमाचं शूटिंग जपानमध्ये सुरू आहे. सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये जुनैद खान आणि साई पल्लवी दिसत आहेत.
या सिनेमात जुनैद आणि साई पल्लवी रोमान्स करताना दिसणार आहेत. जपानमध्ये सध्या बर्फवृष्टी होत असल्याने सिनेमाचं शूटिंग करण्यात अडचणी येत आहेत. पण, तरीही सिनेमाचं शूटिंग सुरू आहे. जुनैद हा आमिर आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ता यांचा मुलगा आहे. आमिरने १९८६ साली रिना दत्ताशी लग्न केलं होतं. त्यानंतर २००२ मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले. त्यांना आयरा आणि जुनैद ही दोन मुले आहेत. आयराच्या लग्नात आमिरची संपूर्ण फॅमिली एकत्र दिसली होती.