"मी गौरीशी आधीच लग्न केलंय...", वयाच्या ६० व्या वर्षी प्रेमात पडलेल्या आमिर खानचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 09:19 IST2026-01-22T09:19:12+5:302026-01-22T09:19:49+5:30

गौरी स्प्रॅटसोबत आमिरचं लग्न झालं?

aamir khan reveals he is already married to gauri spratt in his mind says we are partners | "मी गौरीशी आधीच लग्न केलंय...", वयाच्या ६० व्या वर्षी प्रेमात पडलेल्या आमिर खानचा खुलासा

"मी गौरीशी आधीच लग्न केलंय...", वयाच्या ६० व्या वर्षी प्रेमात पडलेल्या आमिर खानचा खुलासा

'परफेक्शनिस्ट' अभिनेता आमिर खानच्या वैवाहिक आयुष्याविषयी सर्वांना माहितच आहे. बालपणीची मैत्रीण रीना दत्ताशी लग्न मग घटस्फोट, त्यानंतर निर्माती किरण रावसोबत तो विवाहबद्ध झाले. काही वर्षांनी त्यांचाही घटस्फोट झाला. तर आता आमिर तिसऱ्यांदा प्रेमात पडला आहे. वयाच्या ६० व्या वर्षी तो गौरी स्प्रॅटच्या प्रेमात आहे. आता तो गौरीशी तिसरं लग्न करणार असा प्रश्न अनेकदा त्याला विचारला जातो. यावर त्याने मी गौरीशी आधीच लग्न केलं असल्याचा खुलासा केला आहे. नक्की काय म्हणाला आमिर खान?

बॉलिवूड हंगामाशी बोलताना आमिर खान म्हणाला, "गौरी आणि मी एकमेकांसोबत खूप सीरियस आहोत. आमचं नातं मजबूत आहे. आम्ही पार्टनर आहोत आणि सोबत आहोत. लग्नाचं म्हणाल तर मनातून मी गौरीशी आधीच लग्न केलं आहे. आता याला औपचारिक रुप द्यायचं की नाही हे मी येत्या काळात ठरवेन."

आमिर खानने गेल्या वर्षी त्याच्या ६० व्या वाढदिवशी गर्लफ्रेंड गौरी खानला जगासमोर आणलं. तेव्हा सर्वानाच धक्का बसला होता. गौरी आणि आमिर एकमेकांना २५ वर्षांपासून ओळखतात. मात्र गेल्या अडीच वर्षांपासून ते डेट करत आहेत. किरण रावसोबत घटस्फोटानंतर आमिर एकटा पडला होता. त्याला जीवनसाथीची गरज होती. अशात त्याचा गौरीची साथ मिळाली. ती त्याला खूप छान समजून घेते असं तो म्हणाला होता. गौरी आणि त्याच्यात १२ वर्षांचं अंतर आहे. गौरीचाही आधी एक घटस्फोट झाला असून तिला एक मुलगाही आहे.

आमिर खानचं पहिलं लग्न १९८६ साली रीना दत्तासोबत झालं होतं. त्यांना जुनैद आणि आयरा ही मुलं झाली. १६ वर्षांनी २००२ साली आमिर आणि रीनाचा घटस्फोट झाला. यानंतर आमिर पूर्णपणे कोलमडला होता. २००५ मध्ये आमिरने किरण रावसोबत लग्न केलं. त्यांनी सरोगसी पद्धतीने मुलगा झाला. त्याचं नाव आजाद आहे. किरण आणि आमिरचाही १६ वर्षांनी २०२१ साली घटस्फोट झाला. आजही आमिर आपल्या दोन्ही एक्स पत्नींच्या जवळ आहे.

Web Title : आमिर खान का खुलासा: 60 की उम्र में गौरी से आध्यात्मिक विवाह कर चुके

Web Summary : आमिर खान, 60 वर्ष की आयु में, गौरी स्प्रैट के साथ गहरे रिश्ते का खुलासा करते हैं। औपचारिक विवाह पर विचार करते हुए, उन्होंने कहा कि वे पहले से ही आध्यात्मिक रूप से विवाहित हैं, एक मजबूत बंधन में भागीदार हैं। खान ने, जिन्होंने पहले दो बार शादी की, पिछले साल स्प्रैट को पेश किया, किरण राव से तलाक के बाद उनके 2.5 साल के रिश्ते को स्वीकार किया।

Web Title : Aamir Khan Confesses: Already Married Gauri Spiritually at 60

Web Summary : Aamir Khan, at 60, reveals a deep relationship with Gauri Spratt. While considering a formal wedding, he states they are already married in spirit, partners in a strong bond. Khan, previously married twice, introduced Spratt last year, acknowledging their 2.5-year relationship after his divorce from Kiran Rao.