Krishna Raj Kapoor Funeral : कृष्णा राज कपूर यांच्या अंत्यदर्शनाच्यावेळी हे सेलिब्रेटी चक्क रंगले हास्यविनोदात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 17:51 IST2018-10-03T17:50:47+5:302018-10-03T17:51:53+5:30
कृष्णा राज कपूर यांच्या अंत्यदर्शनाच्या वेळेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरला झाला आहे. या व्हिडिओमध्ये करण जोहर, राणी मुखर्जी, आमिर खान, आलिया भट्ट हे चक्क हसताना दिसत आहे.

Krishna Raj Kapoor Funeral : कृष्णा राज कपूर यांच्या अंत्यदर्शनाच्यावेळी हे सेलिब्रेटी चक्क रंगले हास्यविनोदात
कृष्णा राज कपूर यांचे नुकतेच मुंबईत निधन झाले. दीर्घकाळापासून कृष्णा राज कपूर आजारी होत्या. कृष्णा राज कपूर यांना अनेक वर्षांपासून श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. त्यांच्या अंत्यदर्शनाला बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. अनिल कपूर, त्याची पत्नी सुनीता कपूर, संजय कपूर, त्याची पत्नी महीप कपूर, प्रेम चोप्रा, काजोल, राणी मुखर्जी, सैफ अली खान, टीना अंबानी, अमिताभ बच्चन, आमिर खान, अयान मुखर्जी यांसारख्या अनेक कलाकारांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अंतिम दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या कुटुंबातील रणधीर कपूर, राजीव कपूर, रिमा जैन, करिना कपूर, करिश्मा कपूर, आदर जैन उपस्थित होते.
मधुर भांडारकरच्या पेज 3 या चित्रपटात सेलिब्रेटींच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकण्यात आलेला आहे. या चित्रपटात हे सेलिब्रेटी एखाद्याच्या अंत्ययात्रेला जाऊन कसे वागतात हे देखील दाखण्यात आले होते. अशीच काही परिस्थिती दिवंगत अभिनेते राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांच्या अंत्ययात्रेच्यावेळी पाहायला मिळाली.
कृष्णा राज कपूर यांच्या अंत्यदर्शनाच्या वेळेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरला झाला आहे. या व्हिडिओमध्ये करण जोहर, राणी मुखर्जी, आमिर खान, आलिया भट्ट हे चक्क हसताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटिझन्सनी सोशल मीडियाद्वारे या सगळ्यांना चांगलेच सुनावले आहे. हा व्हिडिओ पाहून पेज 3 या चित्रपटातील दृश्य पाहिल्यासारखे वाटत असल्याचे काहींचे म्हणणे होते तर काही नेटिझन्सनी तुम्ही अंतिमदर्शनासाठी गेला होता की मजा करायला असा प्रश्न विचारला आहे.
कृष्णा राज कपूर यांना रणधीर कपूर, राजीव कपूर, ऋषी कपूर, रिमा व रितू अशी पाच मुले असून करिना कपूर, करिश्मा कपूर , रणबीर कपूर आणि रिद्धिमा कपूर यांच्या त्या आजी होत्या. ८७ वर्षांच्या वयातही कृष्णा बऱ्याच अॅक्टिव्ह होत्या. फॅमिली पार्टी आणि अनेक चित्रपटाच्या प्रीमिअरला त्या हजेरी लावत. १९८८ मध्ये राज कपूर यांचे निधन झाले़ यानंतर कृष्णा यांनीच संपूर्ण घराला आधार दिला.
Looks Straight from film Page3 at #KrishnaRajkapoor funeral,see @karanjohar laughing with Rani M @aamir_khan@aliaa08 . #Shame But nobody will condemn for sure.👍 @navikakumar@ShefVaidya@JagratiShukla29@DrGPradhan@TarekFatah@amritabhinder@trehan_barkha@SureshNakhuapic.twitter.com/wOvShFuibc
— Neetu ❤ (@NeetalSengar) October 2, 2018