Aamir Khan Video : भावा, तू तर म्हातारा झालास..., आमिर खानचा नवा लुक पाहून चाहते हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 15:03 IST2022-12-08T15:03:02+5:302022-12-08T15:03:33+5:30
Aamir Khan : ‘सलाम वेन्की’ (Salaam Venky) या सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगला आमिर दिसला आणि त्याला पाहून लोक हैराण झालेत.

Aamir Khan Video : भावा, तू तर म्हातारा झालास..., आमिर खानचा नवा लुक पाहून चाहते हैराण
आमिर खानचा (Aamir Khan ) ‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉप झाला आणि तसा आमिर गायब झाला. अद्याप तरी आमिरने त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केलेली नाही. लोकांच्या नजरेपासून तो दूर आहे. पण काल काजोलच्या ‘सलाम वेन्की’ (Salaam Venky) या सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगला आमिर दिसला आणि त्याला पाहून लोक हैराण झालेत.
‘सलाम वेन्की’या चित्रपटात अभिनेता आमिर खानही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतंच मुंबईत या चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आलं होतं. बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली. पण सर्वाधिक चर्चा झाली ती आमिरची. होय, त्याचा लुक पाहून अनेकांना धक्का बसला.
काळ्या रंगाचा टी-शर्ट, डेनिम जॅकेट आणि मॅचिंग ट्राउझर्स अशा लुकमध्ये आमिरने एन्ट्री घेतली. पण त्याची पांढरी दाढी अन् पांढरे केस याचीच जास्त चर्चा रंगली. काहींना आमिरचा हा लुक आवडला. पण काही युजर्सनी हा लुक पाहून आमिरची जबरदस्त खिल्ली उडवली. आपल्या आवडत्या हिरोला असं म्हातारं झालेलं बघून अनेकांची निराशा झाली.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने आमिरचा एक व्हिडीओ शेअर केला आणि या व्हिडीओवर चाहत्यांनी एकापेक्षा एक कमेंट्स केल्या. ‘आयला, चिकनी चमेली से पुरानी हवेली कैसे बन गये भाई,’ अशी कमेंट एका युजरने केली. अरे हा कोण आहे? आमिर खान? असं एका युजरने लिहिलं. शेव कर, तरूण दिसशील, असा सल्ला एका युजरने आमिरला दिला.
दरम्यान ‘सलाम वेन्की’या चित्रपटाबद्दल सांगायचं तर हा सिनेमा रेवती यांनी दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात काजोल लीड रोलमध्ये आहे. तिच्याशिवाय राजीव खंडेलवाल, विशाल जेठवा, आहाना कुमरा, प्रकाश राज या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील.
आमिर यात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.‘सलाम वेन्की’ हा तरुण बुद्धिबळपटू कोलावेन्नू वेंकटेशच्या सत्य कथेपासून प्रेरित आहे. त्याला ड्यूचेन मस्क्यूलर डिस्ट्रॉफी या आजाराचं निदान झालं होतं आणि 2004 मध्ये त्यांचं निधन झालं होतं. हा चित्रपट उद्या 9 डिसेंबरला प्रदर्शित होतोय.