आमिर खान नवीन लुकमुळे होतोय ट्रोल, नेटकरी म्हणाले, "लवकर आणखी एक लग्न..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 11:09 IST2023-10-05T11:08:48+5:302023-10-05T11:09:33+5:30
मोठे कुरळे केस, चष्मा अशा लुकमध्ये आमिर खानला बघून सगळेच आश्चर्यचकित झाले.

आमिर खान नवीन लुकमुळे होतोय ट्रोल, नेटकरी म्हणाले, "लवकर आणखी एक लग्न..."
सेलिब्रिटी कधी काय लुक करतील सांगता येत नाही. सिनेमासाठी किंवा सहज फॅशन म्हणून कलाकार वेगवेगळ्या लुकमध्ये दिसतात. नुकतंच परफेक्शनिस्ट आमिर खान मुंबईत वेगळ्याच लुकमध्ये दिसला. सेलिब्रिटी फोटोग्राफर अविनाश गोवारीकरच्या बर्थडे सेलिब्रेशनला अनेक स्टार्सने हजेरी लावली. यावेळी आमिर खानच्या (Aamir Khan) लुकने सर्वांचं लक्ष वेधलं.
मोठे कुरळे केस, चष्मा अशा लुकमध्ये आमिर खानला बघून सगळेच आश्चर्यचकित झाले. त्याने यावेळी स्ट्राईप टीशर्ट आणि निळ्या रंगाचा शॉर्ट कुर्ता घातला होता. बाहेर जमलेल्या चाहत्यांसोबत त्याने फोटोही काढले.त्याचा हा लुक नक्की कोणत्या सिनेमासाठी आहे की त्याने केवळ फॅशन म्हणून हा लुक केलाय असा प्रश्न चाहत्यांना पडलाय.
आमिरच्या या लुकवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत त्याची खिल्ली उडवली आहे. 'नवा पिक्चर सुरु करा. नाहीतर लोकं विसरुन जातील' अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने आमिर खानला लग्नावरुन डिवचलं. 'लग्न कधी करणारेस, लवकर अजून २-३ लग्न करुन टाक' अशी कमेंट नेटकऱ्याने केली आहे.
आमिर खानचा शेवटचा 'लाल सिंग चड्डा' सिनेमा आला होता. मात्र ट्रोलिंग, बॉयकॉट ट्रेंडमुळे हा सिनेमा चांगलाच आपटला. यामुळे आमिर खानला मोठा सेटबॅक बसला. पण आता तो कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे. सनी देओलला घेऊन आमिर खान 'लाहोर 1947' सिनेमाची निर्मिती करणार आहे.